असे गुन्हे करणार्‍या आरोपींना कडक शिक्षा कधी ?

असे गुन्हे करणार्‍या आरोपींना कडक शिक्षा कधी ? When will the accused who commit such crimes be severely punished ?
चोरट्यांशी झुंज देताना मध्यरेल्वेच्या धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू पावलेल्या श्रीमती विद्या पाटील व वास्को निजामुद्दीन एक्सप्रेस मध्ये मध्यरात्री, अत्याचारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस लोणंद वाठार ,जिल्हा सातारा स्टेशनजवळ चालत्या गाडीतून फेकल्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांचे पोलीस महासंचालक यांना सूचना…

पुणे/ मुंबई/ सातारा ०१ जून,२०२१ – श्रीमती विद्या पाटील या दि.३१ मे, २०२१ रोजी डोंबिवली कडे प्रवास करत असताना मध्य रेल्वेच्या कळवा ते मुंब्रा दरम्यान त्यांचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्या सोबत त्यांची झटापट झाली व त्या यामध्ये त्या रेल्वेगाडीखाली येऊन मृत्यू पावल्या .

    तसेच सातारा जिल्ह्यातील लोणंद वाठार स्टेशन जवळ वास्को निजामुद्दीन एक्सप्रेस मध्ये अल्पवयीन मुलीने अत्याचारास विरोध केल्यामुळे आरोपीने चालत्या तिला रेल्वेगाडीतून खाली फेकण्यात आले. दुर्दैवाने या प्रकरणात आरोपी सेनादलातील असल्याचे समजते. सदर दुर्दैवी घटनांच्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे आणि अपर पोलीस महासंचालक श्रीमती प्रज्ञा सरवदे यांना पत्र देऊन तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना दिली.

    सदरील पत्रात रेल्वेमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक पावले उचलणे गरजेचे आहे. रेल्वे सुरक्षा बल,लोहमार्ग पोलीस, गाडीमध्ये हत्यारी सुरक्षारक्षक नेमणे यासोबतच प्रत्येक बोगी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावून त्याचे लाईव्ह निरीक्षण करणे ,महिला डब्यामध्ये सशस्त्र महिला पोलीस नियुक्त करणे ,रेल्वेच्या सराईत गुन्हेगारांवर सक्त कारवाई करणे ही आवश्यक आहे. यामुळे महिलांना रेल्वेमधून सुरक्षित प्रवास करणे शक्य होईल असे डॉ.गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.

  तसेच दोन्ही प्रकरणात कनिष्ठ अधिकार्यांना मार्गदर्शन करुन आरोपीना जामीन मिळणार नाही आणि अधिकात अधिक शिक्षा होईल हे पहाणे आवश्यक आहे. 

 ठाण्यातील विद्या पाटील हिच्या कुटुंबाला व सातारा लोणंद यामधील मुलीला मनोधैर्य योजने तून अथवा रेल्वेच्या योजनेतून आर्थिक सहाय्य करावे अशी विनंती देखील डॉ.गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालक यांना केली आहे.

 पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी निवेदन मिळाल्यानंतर लगेचच लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

  वास्तविक महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहेत. आरोपी खुलेआम फिरत आहेत.अत्याचार  हे विविध स्वरुपात होत आहेत. पोलिस आणि कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. पैसे फेकले की कसल्याही गुन्ह्यातून सुटू शकतो हा आत्मविश्वास निर्माण झालेल्यांकडून असे गुन्हे सतत घडत आहेत.अशा गुन्हेगारांवर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि खटले प्रामाणिकपणे चालवून आरोपींना कडक शिक्षा सुनावली जाणे अपेक्षित आहे.     

Live Sachcha Dost TV

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: