ना.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पुढाकाराने गरजू बालरुग्णांना दिलासा

ना.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये मोफत 2D इको तपासणी व लहान मुलांसाठी हृदय शस्त्रक्रिया शिबीर

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या पुढाकाराने गरजू बालरुग्णांना दिलासा

नांदेड | ज्ञानप्रवाह न्यूज – एकनाथ हिरक महोत्सवांतर्गत मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमतचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा), विधानपरिषद गटनेते तसेच हिंगोली व बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख ना.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड येथे सामाजिक बांधिलकी जोपासणारे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील हृदयात छिद्र असलेल्या लहान मुलांसाठी मोफत 2D इको तपासणी व हृदय शस्त्रक्रिया संदर्भातील विशेष शिबीर श्री गुरुगोविंद सिंगजी जिल्हा रुग्णालय शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये मुंबई येथील KIIMS हॉस्पिटल तसेच नांदेड येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून गरजू बालरुग्णांना मार्गदर्शन केले. गंभीर रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रिये साठी आवश्यक ती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आली. उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना योग्य सल्ला,उपचाराची दिशा आणि आवश्यक मदतीची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमास ना.हेमंत पाटील,आमदार बालाजी कल्याणकर,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे,गोदावरी समूहाच्या अध्यक्षा सौ.राजश्री ताई हेमंत पाटील,सिव्हिल सर्जन डॉ.संजय पेरके, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. श्रीनिवास, वैद्यकीय मदत कक्षाचे संपर्कप्रमुख सोमनाथ हट्टेकर, सहसंपर्क प्रमुख दर्शनसिंघ सिध्दू यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा,तालुका व शहरस्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गरजू रुग्णांना प्रत्यक्ष भेटून धीर दिला तसेच ना.हेमंत पाटील यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे अनेक गरजू बालरुग्णांना नवे जीवन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शिवसेनेची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Back To Top