स्वेरीत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रासेयो व माजी विद्यार्थी संघटनेचा स्तुत्य उपक्र
प्राध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी व्यापक आरोग्य तपासणी:स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ७५ जणांचा उत्स्फूर्त सहभाग
पंढरपूर येथील Shri Viththal Education and Research Institute संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित. ७५ प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची विविध वैद्यकीय चाचण्या; आरोग्य जागरूकतेस चालना.
Pandhapur news : पंढरपूर-गोपाळपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०२/२०२६ : पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील Shri Viththal Education and Research Institute संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) स्वेरी येथे राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभाग व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार,दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाला प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.संस्थेचे संस्थापक व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.सोलापूर येथील Walchand College of Arts and Science मधील इतिहास विभागाचे प्रा.डॉ.चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
हे शिबिर Sub District Hospital Pandharpur कॉटेज हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. रुग्णालयाचे प्रतिनिधी सुधीर भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने विविध तपासण्या केल्या.यामध्ये लिपिड प्रोफाइल, एलएफटी,केएफटी,शुगर,सीबीसी,एचबी, कॅल्शियम, युरिक ॲसिड, प्रोटीन्स, आरए,थायरॉईड चाचणी आदींचा समावेश होता.प्रत्येक सहभागी व्यक्तीच्या किमान पाच तपासण्या करण्यात आल्या. या शिबिराचा लाभ महाविद्यालयातील सुमारे ७५ प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतला.या उपक्रमामुळे आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपायांची जाणीव वाढण्यास मोठी मदत झाली.
या कार्यक्रमाच्या यशासाठी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती,प्रा.अविनाश मोटे,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल चौंडे,प्राध्यापकवर्ग व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे पंढरपूर विभागीय समन्वयक डॉ. संजय मुजमुले, सचिव डॉ. सुरज रोंगे, माजी विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी दत्तात्रय घोडके, विद्यार्थिनी मृणालिनी सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी आणि आरोग्य जागरूकतेचा संदेश देणारा हा उपक्रम शैक्षणिक संस्थांच्या समाजाभिमुख भूमिकेचा उत्तम आदर्श ठरला आहे.



