वाखरीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ; 4.36 लाख बालकांना लसीकरणाचे लक्ष्य
पंढरपूर : ‘दोन थेंब प्रत्येक वेळी’ संदेशासह राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाची जिल्ह्यात उत्साहात सुरुवात
पंढरपूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ जून २०२६ : ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज आयुष्यमान आरोग्य उपकेंद्र,वाखरी ता. पंढरपूर येथे उत्साहात करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन,मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश कोपूरवाड,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा डोईफोडे,पंचायत समिती सभापती डॉ शुभम आगवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले,वैद्यकीय अधीक्षक डॉ.सरडे, डॉ.सुडके,प्रा.आ.केंद्र गादेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आगावणे, सांख्यिकी अधिकारी हेमंत पवार हे उपस्थित होते. तसेच परिसरातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,वाखरी चे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामपंचायत अधिकारी श्री.कोळी,आरोग्य कर्मचारी, पालक व लाभार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 5 वर्षांखालील बालकाला पोलिओचा डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील आजच्या पल्स पोलिओ मोहिमेस शुभेच्छा देत ‘दोन थेंब प्रत्येक वेळी,पोलिओवर विजय मिळवू दरवेळी’ हा संदेश दिला.
जिल्ह्यातील 436572 बालकांसाठी 6,513 लसीकरण बूथवर 7,222 कर्मचारी कार्यरत आहेत.0 ते 5 वर्षांखालील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. कार्यक्रमास उपस्थित पालकांनी आपल्या बालकांना पोलिओचा डोस पाजून मोहिमेत सहभाग नोंदवला.

