बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र ने या लोकसभा मतदारसंघात पाठिंबा केला जाहीर

बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र ने या लोकसभा मतदारसंघात पाठिंबा केला जाहीर

लोकशाही वाचवण्यासाठी आणि हुकूमशाही रोखण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्रने घेतला हा निर्णय

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकरी शेतमजूर युवक महिला व्यापारी यांच्या भविष्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आणि हुकूमशाही रोखण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराज, हातकणंगले राजू शेट्टी, सांगली -विशाल पाटील,सातारा- शशिकांत शिंदे, माढा -धैर्यशील मोहिते पाटील,सोलापूर -प्रणिती शिंदे, उस्मानाबाद- ओमराजे निंबाळकर, बारामती येथे सुप्रिया सुळे यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पाठिंबा जाहीर केला आहे.

बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील, बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष नितीन पाटील,प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसन खोचरे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अख्तरताज पाटील, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी पाटील, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आण्णासाहेब सुपणवर, बळीराजा शेतकरी संघटना सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष रमेश पवार यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *