पायल वलगे स्मृती प्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पायल वलगे हिच्या स्मृतीप्रित्यर्थ आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- पायल फाउंडेशन नांदोरे ,माऊली वेलनेस सेंटर व राधाकृष्ण वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पायल संतोष वलगे हिच्या स्मृतीप्रित्यर्थ एस.पी. पब्लिक स्कूल,नांदोरे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक आरोग्य सल्लागार वेलनेस कोच महेश काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य सल्लागार शरद शिंदे, ज्योतीराम कदम, सामाजिक कार्यकर्ते संजय शहा, झाशीची राणी पुरस्कार प्राप्त अनुराधा सुळे, मनीषा काळे आदी इ. मान्यवर होते.

 यावेळी शरद शिंदे यांनी आपल्या मनोगतात सेंद्रिय शेती ,तिचे निरोगी आरोग्याविषयी महत्व, दैनंदिन आहार तसेच रासायनिक खतांचे होणारे दुष्परिणाम याविषयी सखोल मार्गदर्शन केले

ज्योतीराम कदम, संजय शहा, सौ.अनुराधा  सुळे ,सौ.मनीषा काळे यांनी आपल्या मनोगतातून तणाव मुक्त जीवन कसे जगावे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सकस संतुलित आहार कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

पायल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.संतोष वलगे यांनी पायलच्या आठवणींना उजाळा दिला व दरवर्षी पायलच्या स्मृती दिना निमित्त दरवर्षी राबवित असलेल्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली तसेच अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना मदत म्हणून रोख रक्कम सामाजिक कार्यकर्ते संजय शहा यांच्याकडे सुपूर्त केली.

यावेळी फाउंडेशनचे सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, सोमनाथ वलगे, संचालिका स्वाती चव्हाण, निर्मला भिंगारे यांच्यासह एस.पी. स्कूलमधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. सर्व उपस्थितांची आरोग्य तपासणी करण्यात आली व सर्वांना हर्बल कीटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साईनाथ कुंभार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *