सातारा जिल्हा पोलिस दलातील ११ जणांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर
सातारा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26/04/2024 – राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २०२३ वर्षातील पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले आहेत.त्यामध्ये राज्यातील ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे पदक मिळाले असून सातारा जिल्हा पोलिस दलातील ११ जणांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दोन अधिकारी आणि ९ कर्मचारी यांना २०२३ वर्षासाठी पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहेत. यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनाही हे सन्मानचिन्ह मिळाले आहे.पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके हे सध्या सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस दलात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. पंढरपूर पोलिस ठाण्याचा चार्ज घेतल्यापासून शहरात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.
संजय टिळेकर,कमलाकर कुंभार,भरत शिंदे, श्रीधर ठोंबरे आणि नंदकुमार महाडिक या सहायक पोलिस उपिनरीक्षकांना तर हवालदार महादेव घाडगे, विनोद राजे आणि पोलिस शिपाई बिपीन ढवळे व मंगेश जाधव यांनादेखील पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.