महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त मंदिर समिती च्यावतीने ध्वजारोहण संपन्न

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने ध्वजारोहण संपन्न

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०५/२०२४- महाराष्ट्र राज्याच्या 64 व्या वर्धापन दिना निमित्त श्री संत तुकाराम भवन येथे मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे व श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या ध्वजारोहण सोहळ्यास मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच मंदीर समितीचे विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामधील भोजन प्रसादामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता. या भोजन प्रसादाचा सुमारे 1000 ते 1200 भाविकांनी लाभ घेतला. त्याचबरोबर दुपारी पोशाखा वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेस परंपरेनुसार दागिने परिधान करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *