बालकातील जन्मजात व्यंग निदान व समुपदेशन शिबीर संपन्न
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.29:- बालकातील जन्मजात दोष, व्यंग या आजारावरील निदान व उपचार शिबिर नवजीवन हॉस्पिटल, पंढरपूर येथे संपन्न झाले. या शिबिरामध्ये जन्मजात व्यंग असलेले ५१ बालके तपासले गेले व त्यांच्या पालकांना समुपदेशन व पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
सदर शिबीर उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, स्पायना बायफिडा फाउंडेशन मुंबई ,नवजीवन हॉस्पिटल पंढरपूर,अग्रज हॉस्पिटल पंढरपूर,स्त्री आरोग्य तज्ञ संघटना पंढरपूर आयएमए पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते.
शिबिरासाठी मुख्य अतिथी म्हणून सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर, डॉ संतोष करमरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ. स्नेहा सावंत,संचालक उमा काळेकर,डॉ शितल शहा,डॉ महेश तळपल्लिकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ एकनाथ बोधले, डॉ सुनील कारंडे आदी उपस्थित होते.
आय एम ए हॉल येथे पंढरपूर येथील सर्व डॉक्टरांसाठी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये मुंबई येथील बालशल्य विशारद डॉ.संतोष करमरकर,सोलापूर येथील डॉ.महेश तळपल्लीकर,डॉ.सुमित चमारिया,डॉ सुदेश दोशी,डॉ.मंदार सोनवणे तसेच पंढरपूर मधील डॉक्टरांनी व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा तील वैद्यकीय अधिकारी यांनी सहभाग घेतला होता.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा रुग्णालयाचे बाह्य संपर्क अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश सुडके व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कुलदीप डोके यांनी विशेष परिश्रम घेतले. अग्रज हॉस्पिटलचे डॉ.सुदेश दोशी पंढरपूर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम कदम यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ.सुधीर आसबे यांनी केले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.