तुमची एक बहीण म्हणून तो संघर्ष कधीच वाया जाऊ देणार नाही मी तुमच्या प्रत्येक लढ्यात सोबत असल्याचे आश्वासन दिले प्रणिती शिंदे यांनी

संभाजी ब्रिगेडचा प्रणितीताई शिंदे यांना पाठींबा

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना शनिवारी संभाजी ब्रिगेडच्यावतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांची विचारधारा जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून आम्ही या निवडणुकीस पाठींबा देत असल्याचे संभाजी ब्रिगेडकडून स्पष्ट करण्यात आले.

संभाजी ब्रिगेड महासचिव सौरभ खेडेकर यांनी प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे पत्र दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष – प्रकाश ननवरे, सोलापूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले,युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे आदी उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेड कडून प्रणिती शिंदे यांनी निवडून आल्यावर समाजाच्या काही मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले. त्यामध्ये
१)मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश होणेबाबत.
२) शिवस्मारक पूर्ण होणेबाबत.
३) स्वामीनाथन आयोग लागू करणे बाबत.
४) सर्व शिक्षण मोफत मिळावे. (KG to PG)
५) तरुणांना रोजगार मिळावा
६) कंत्राटी भरती न होऊ देणेबाबत.
७) जिह्यातील शेतीविषयक पाण्याचे धोरण राबविणे.

यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, संभाजी ब्रिगेडने आम्हाला या निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. मराठा आरक्षणासह इतर काही विषयाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचा जो संघर्ष सुरु आहे. तुमची एक बहीण म्हणून तो संघर्ष कधीच वाया जाऊ देणार नाही. मी तुमच्या प्रत्येक लढ्यात तुमच्या सोबत असल्याचे आश्वासनही प्रणिती शिंदे यांनी दिले.

प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, भाजपकडून जाती-धर्माचे राजकारण करून द्वेष निर्माण केला जात आहे.दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करून सोलापूरची एकी बिघडवण्याचे पाप भाजप करत आहे. त्या विरोधात आपल्या सगळ्यांना एकत्र येत काम करायचे आहे.त्यांना लोकशाहीची समाजाची ताकद काय असते हे येत्या सात मे ला मतदानातून दाखवून द्यायचे.त्यामुळे लोकसभेची ही निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुम्हा सर्वांचा असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे मनोजकुमार गायकवाड सहसंघटक संभाजी ब्रिगेड,दिनेश जगदाळे राज्य कार्यकारिणी सदस्य, किरणराज घाडगे विभागीय अध्यक्ष,पुणे विभाग,सोमनाथ राऊत सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड ,प्रकाश ननवरे सोलापूर शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड,कृष्णात पवार सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड, दयानंद काजले सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, अजय सोमदले सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, मनोज गंगणे अक्कलकोट तालुका अध्यक्ष, सुरेश कदम अक्कलकोट शहर अध्यक्ष, अभिजित भोसले मोहोळ तालुकाध्यक्ष, विष्णू मुळे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष , मनोज महाडिक दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष, आनंद काशीद बार्शी तालुकाध्यक्ष, ललित धावणे,सचिन चव्हाण,नितीन मोहिते, सोमनाथ निंबाळकर,नितीन चव्हाण, किसन गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *