लसूण चोरणारा आरोपी हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या जाळ्यात
शेतातील १५० किलो लसूण चोरणारा आरोपी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण १५,०००/- रु.चा माल जप्त Accused of stealing garlic caught by Hinganghat crime detection squad


हिंगणघाट -दि.११-०५-२०२१ चे रात्रदरम्यान फिर्यादी नामे देवानंद मोहारे यांचे शेतातील बंडयाचे कुलुप तोडुन लसूणाचे ५ कट्टे ,वजन १५० किलो, किंमत १५,०००/ – रू. चा माल कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पो.स्टे. हिंगणघाट येथे अपराध क्र . ४४२/२०२१ कलम ४६१ , ३८० भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला . सदर गुन्ह्याची तात्काळ दाखल घेवून पो.स्टे. हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाने हिंगणघाट शहर व लगतचे परिसरात सतत माहीती काढुन अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मालाचा शोध सुरु असता मिळालेल्या गोपनिय माहितीवरून अमोल यादवराव वडे , वय ३३ वर्ष ,रा.भिमनगर वार्ड ,हिंगणघाट याच्यावर संशय आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी केली असता त्याने सांगितले कि ,सदरचे लसणाचे कट्टे त्यानेच चोरले असून ते कट्टे त्याच्या घरी ठेवले आहेत .

   त्यावरून त्याचे घरी जावुन शहानिशा करून त्याचे ताब्यातुन सदरचे लसणाचे ५ पोते एकुण १५० किलो , एकुण जु.कि. १५,००० / - रू . चा माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला . 

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर ,अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके , उपविभागीय पोलीस अधिकारी ,हिंगणघाट ,दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पो.नि. संपत चव्हाण यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अंमलदार शेखर डोंगरे ,निलेश तेलरांधे , सचिन घेवंदे ,विशाल बंगाले ,सचिन भारशंकर सर्व नेमणूक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांनी केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *