देशाच्या आणि सोलापूरच्या उन्नतीसाठी केंद्रामध्ये खंबीर नेतृत्वाची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही – मा.आ.प्रशांत परिचारक

मोहोळ तालुक्यातील पुळूज येथे पांडुरंग परिवार कार्यकर्ता विचार विनिमय बैठक

पुळुज ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील पुळूज येथे पांडुरंग परिवार कार्यकर्ता विचार विनिमय बैठक पार पडली.या बैठकीसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुती भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते उपस्थित होते.

पांडुरंग परिवाराने आपुलकीने स्वागत करत लोकसभा विजयासाठी महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना शुभेच्छा दिल्या.सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक व मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पार पडलेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक घटकाने एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी बैठकीला मार्गदर्शन करताना गेल्या १० वर्षांमध्ये मोदी सरकारच्या नेतृत्वामध्ये अनेक विकासकामे झाली असून देशाच्या आणि सोलापूरच्या उन्नतीसाठी केंद्रामध्ये खंबीर नेतृत्वाची गरज असून पंतप्रधान नरेंद्र मोदीं शिवाय देशाला पर्याय नाही. त्यासाठी सर्वांनी महायुतीच्या शिलेदाराला मोठया मताधिक्याने निवडून देण्यासाठी मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ नेते व मा.आमदार राजन पाटील यांनी बैठकीला संबोधित करताना येणारा काळ सोलापूर मतदारसंघासाठी सुवर्णकाळ असून अनेक नवीन विकासकामे होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात अनेक बदल पाहायला मिळत आहेत.सोलापूर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन मोदीजींच्या शिलेदाराला पुन्हा एकदा निवडून आणायचे आहे असे आवाहन केले.

मी तुमच्या परिवारातील एक सदस्य असून माझ्या परिवाराच्या कल्याणासाठी सदैव उपलब्ध राहणार आहे.गावागावांत मला अनेक विकासकामांना महत्त्व द्यायचे असून त्यासाठी तुम्हा सर्वांची मोलाची साथ मला हवी आहे.आपले यावेळचे एक बहुमोल मत हे फक्त महायुतीच्या उमेदवाराला म्हणून नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातील विकसित राष्ट्रासाठी द्यावयाचे आहे’, असे आवाहन सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी बोलताना केले.

याप्रसंगी मोहोळचे आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप तुकाराम घाडगे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर भाऊ मोरे, संचालक दिलीप चव्हाण, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, उपसभापती राजू बापू गावडे, मंडळ अध्यक्ष भास्कर कसगावडे,प्रशांत देशमुख,पंडित भोसले,संतोष घोडके, युवा गट मोर्चा सुनील भोसले,मोहन खरात, तानाजी पवार,पंडित रोबडे,महादेव बागल, महादेव लवटे,नागनाथ मोहिते,बाबासो पाटील तसेच पांडुरंग परिवारचे कार्यकर्ते व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *