पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपला देश चांगली कामगिरी करत आहे – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपला देश चांगली कामगिरी करत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठीचे संकल्पपत्र नितीन गडकरी आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते व माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ पंढरपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा पार पडली.

याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार करण्यात आला.सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठीचे संकल्पपत्र नितीन गडकरी आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर सभेला अत्यंत उत्साहपूर्णरीतीने संबोधित केले.भारत स्वतंत्र होऊन इतकी वर्ष उलटली तरीसुद्धा ग्रामीण भागात रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधा पोहोचल्या नव्हत्या.गेल्या १० वर्षांमध्ये आपल्या सरकारने ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी यशस्वी योजना आणल्या आणि पूर्वीची नकारात्मक परिस्थिती बदलत आहे.आज ग्रामीण भागांत रस्त्यांचा विस्तार करण्यात आला आहे.पाणी प्रश्नावर काम करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आपला देश चांगली कामगिरी करत असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांचा माल जगाच्या कानाकोपऱ्यात एक्स्पोर्ट होईल मात्र त्यासाठी मोदी सरकार सत्तेत कायम राहण्याची गरज आहे,असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील आपल्या आठवणींना उजाळा देत आपला राम पण विद्यार्थी परिषदेचा उत्तम कार्यकर्ता आहे.आमचा राम सातपुते जनतेच्या विकासासाठी काम करणारा तसेच तरुण मुलांना रोजगार मिळवून देणारा एक इनामदार कार्यकर्ता आहे.मी २० वर्षांपासून राम सातपुते यांना ओळखत असून अशा प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सोलापूर मतदारसंघातून प्रचंड मतांनी विजयी करा आणि सेवेची संधी द्या,असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, माजी आमदार प्रशांत परिचारक,आमदार समाधान आवताडे, माजी मंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे, आमदार गोपीचंद पडळकर, शिवाजी सावंत, शिवानंद पाटील, अनिल सावंत, अमोल शिंदे, दिनकर मोरे, लक्ष्मण पापरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड, दिलीप चव्हाण, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, वर्षांताई शिंदे, आरतीताई बसवंती, प्राजक्ताताई नेवारे, दिलीप घाडगे, वामन माने, बाळासाहेब देशमुख, प्रशांत देशमुख, पंडितराव भोसले, युनूसभाई शेख, राजू गावडे, दिपक भोसले, कैलास खुळे, दादा पाटील तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *