मतदानाच्या काळात कोणत्याही यात्रा,सुट्टी न करता मतदानाचा हक्क बजावा- डॉ नीलम गोऱ्हे यांचे आवाहन
भोर विधानसभा,मुळशी बुथ प्रमुख बैठक व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
भोर (मुळशी)/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१/०३/ २०२४ : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे येत्या काही दिवसात मतदान केले जाईल. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्या कालावधीत कोणतेही तीर्थ यात्रा, ट्रीप किंवा इतर ठिकाणी जाण्याच्या तयारीत राहू नका. आपल्या आपल्या गावात, मतदार संघात रहा असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम ताई गोऱ्हे यांनी केले.
भोर विधानसभा, मुळशी बुथ प्रमुख बैठक व मार्गदर्शन मेळावा रविवार दि ३१ मार्च २०२४ रोजी घोटवडे ता.मुळशी येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे बोलत होत्या.
यावेळी शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे, युवासेना सचिव किरण साळी, मेळाव्याचे आयोजक जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव चांदेरे,विविध शिवसेना पदाधिकरी,महिला कार्यकर्ते, बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर मेळाव्यात बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या महिला या प्रामाणिक असतात; देशाच्या इतिहासात कुठे ही बँकेला फसवून एखादी महिला पळून गेली असे उदाहरण नाही. मतदानाच्या बाबतीतदेखील मतदार म्हणून महिला प्रामाणिक राहतील असा विश्वास मला आहे. कुठे पाण्याची गरज भासत असेल तर तहसीलदारांच्या सहाय्याने पाणी सुविधा पूर्ण करता येते. त्याला आचार संहिता लागू आहे म्हणून टाळू नका. मतदार आजारी असेल तर त्याला मदत करून मतदानासाठी प्रेरित करा असे प्रतिपादन त्यांनी केले.
जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, उपनेत्या कलाताई शिंदे, बाबुराव चांदरे, किरण साळी यांनी देखील मनोगतं व्यक्त केली.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------