वृक्षप्रेमी आमदार सुभाष देशमुख यांची सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीस भेट

वृक्ष प्रेमी आमदार सुभाष देशमुख यांची सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीस भेट

सरकोली ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – रविवार दि ०९/०६/२०२४ रोजी सोलापूर येथील आमदार सुभाष देशमुख हे सुस्ते येथे अनंत चव्हाण यांच्याकडे सुस्ते गावातील वृक्ष लागवडीच्या चर्चेसाठी आले होते. त्यावेळी पर्यटन स्थळ निर्मितीसाठी सर्व सरकोलीकरांच्या मदतीने प्रयत्न करणारे माजी पोलीस अंमलदार विलास भोसले हेही गेले होते.

त्यावेळी आमदार सुभाष देशमुख म्हणाले मी सरकोली पर्यटन स्थळ निर्मितीचे काम पहाण्यासाठी येणार आहे. त्याप्रमाणे रविवार दि ०९/०६/२०२४ रोजी दुपारी सुभाष देशमुख यांनी सरकोली पर्यटन स्थळांच्या वृक्षारोपण,बीजारोपण,स्थळे व इतर प्रगतीपथावरील कामांची पाहणी केली. सर्व कामे पाहून समाधान व्यक्त केले.त्यांच्या हस्ते पर्यटनाच्या कामात सतत मदत करणाऱ्या बाल सेवेकर्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

पर्यटन स्थळांच्या केलेल्या कामाचा आढावा ऐकला. सरकोली पर्यटन स्थळ येथे श्रमदान करणाऱ्या सेवेकरी यांच्या कामाची स्तुती केली.व पर्यटन स्थळावर आणखी कोणकोणत्या कामाचे नियोजन आहे याचा सविस्तर आढावा तयार करा तो राज्य पर्यटन विभागाचे शिफारशीने केंद्र सरकारकडे पाठवू व मंजूर करून आणु असे सांगितले.

सुभाष देशमुख हे राज्यातील असे आमदार आहेत की ते जिथे जातील तिथे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन या विषयावर गावकरी, युवक यांच्या बरोबर चर्चा करतात.गावकर्यांना येणाऱ्या शासकीय अडचणी सोडवतात. वृक्ष लागवडीत असणाऱ्या प्रमुखांना स्वत: फोन करून आढावा घेतात व लावलेले वृक्षाचे कसे संवर्धन केले जाते हेही पहाण्यासाठी येतात.लोकमंगल,सोलापूर सोशल फाउंडेशन च्यावतीने वृक्ष संवर्धन या विषयावर अनेक व्याख्याने आयोजित केली आहेत.

चिंचणी पर्यटन स्थळास अनमोल सहकार्य बापुंनी केले आहे. मुंबई,पंढरपूर येथील अजीत कंडरे यांच्या मार्गदर्शनाखाली भंडीशेगाव येथे 17500 रोपांची वृक्ष लागवड केली आहे त्याचाही पाठपुरावा घेतात.त्यांच्या मतदारसंघातही प्रत्येक गावच्या नागरिकांना वृक्ष लागवडीबाबतीत प्रोत्साहित करतात. वृक्ष लागवड, संवर्धन या बाबतीत सोलापूर जिल्ह्याची कामगिरी राज्यात उल्लेखनीय व्हावी यासाठी ते सतत प्रयत्नात असतात.

त्यांच्यासोबत अजित कंडरे,डॉ श्रीधर यलमार,आबासाहेब बाबर, अनंता चव्हाण, गणेश पाटील, तानाजी सालविठ्ठल, कुमार वाघमोडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *