पंढरपूर क्रेडाईच्या अध्यक्षपदी मुकुंद कर्वे यांची फेरनिवड

पंढरपूर क्रेडाईच्या अध्यक्षपदी मुकुंद कर्वे यांची फेरनिवड Re-election of Mukund Karve as President of Pandharpur Credai
क्रेडाई महाराष्ट्राच्या समितीवर निवड झालेले मुकुंद कर्वे पंढरपुरातील पहिलेच सदस्य
खजिनदार मिलिंद देशपांडे सचिव सचिन पंढरपूरकर
      पंढरपूर - पंढरपूर क्रेडाईच्या अध्यक्षपदी मुकुंद अनंत कर्वे यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली .सचिवपदी सचीन पंढरपुरकर यांची खजिनदारपदी मिलींद देशपांडे , उपाध्यक्ष पदी प्रमोद कचरे,सहसचीवपदी शशीकांत लोकरे तर पी.आर.ओ.पदी नगरसेवक विवेक परदेशी यांची निवड एकमताने करण्यात आली. माजी अध्यक्ष तुकाराम राउत व जेष्ठ सदस्य कपिल डिंगरे यांनी या निवडी एकमताने मंजुर झाल्याचे जाहीर केले आणि अमित शिरगावकर यांचे पुढील प्रेसिडेंटपदी नाव निश्चित करण्यात आले.

    क्रेडाई संघटनेमध्ये गेल्या दोन वर्षांत मुकुंद कर्वे व त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या शिस्तबद्ध कामाची पोचपावती म्हणून सर्व सदस्यांकडून एकमताने त्यांचा अध्यक्षपदी फेरनिवड करण्या बाबत ठराव मंजूर करण्यात आला .

   क्रेडाई महाराष्ट्रचे नुतन अध्यक्ष सुनिल फुर्डे यांच्या कोअर टीममध्ये मुकुंद कर्वे यांना स्थान मिळाले असुन क्रेडाई व सीटी ब्रॅडिंग कमिटीची संपुर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. क्रेडाई महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत स्थान मिळालेले पंढरपूरातील ते पहिलेच सदस्य ठरले आहेत.

    क्रेडाई ही बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय पातळीवरील शिखर संस्था असून तिच्या महाराष्ट्रात साठ शाखा आहेत व तीन हजार सदस्य आहेत. क्रेडाई सदस्य असणे हि एक मानाची बाब असुन, सदस्यत्व प्राप्त झाल्यानंतर क्रेडाईचे विषेश कोड ऑफ कंडक्ट असुन त्याप्रमाणे अधिकार व जबाबदारीही असते, सर्व सदस्यांना याचे पालन करणे बंधनकारक असते. बांधकाम क्षेत्रामध्ये कोणतेही बदल घडवताना, नियम बनवताना शासनाच्यावतीने क्रेडाई संघटनेचे मत घेतले जाते, चर्चा केली जाते. क्रेडाई संघटनेला बांधकाम व्यवसायिक व ग्राहक यामधील दुवा मानला जातो. ग्राहकांची कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास ती न्याय्य पद्धतीने क्रेडाई मार्फत सोडवली जाते. शासकीय नियमानुसार रेरा कडे प्रकल्प नोंदणीकृत करण्यासाठी क्रेडाई सदस्य असणे बंधनकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: