charanjit singh channi : पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलणार? मुख्यमंत्री चन्नींनी केली ‘ही’ मागणी


चंदीगड : निवडणूक आयोगाने पंजाब विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. या निवडणुकीसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीचा एक महिन्याचा कालावधी असताना आता पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे. पंजाबची विधानसभा निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी चन्नी यांनी केली आहे. यासाठी चन्नी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. निवडणूक किमान ६ दिवस तरी पुढे ढकलावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी चन्नी यांनी केली आहे.

कारण काय आहे?

मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. १६ फेब्रुवारीला गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील अनुसूचित जाती समाजाचे नागरिक वाराणसीला भेट देतात. पार्श्वभूमीवर निवडणूक किमान ६ दिवस पुढे ढकलावी, अशी मागणी चन्नी यांनी केली आहे. अनुसूचित जाती समाजाच्या प्रतिनिधींनी आपल्याला ही माहिती दिली आहे, असं चन्नी यांचं म्हणणं आहे.

भाजपही मोठा धमाका करणार, मुलायम सिंहांच्या घराण्यातच लावला ‘सुरुंग’!

मुख्यमंत्री चन्नी यांच्या मते, पंजाबमध्ये अनुसूचित जातीचे ३२ टक्के मतदार आहेत. १४ फेब्रुवारीला मतदान झाले तर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने मतदान करू शकणार नाहीत, असे समाज प्रतिनिधींचे म्हणणे आहे. श्री रविदासांच्या जयंतीनिमित्त सुमारे २० लाख नागरिक वाराणसीला भेट देतात.

Punjab Election: सोनू सूदच्या बहिणीला तिकीट देताच काँग्रेसला मोठा धक्का; भाजपने साधली संधी!Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: