देवीची यात्रा आणि बैलगाडा शर्यतीचं आयोजन करणं पडलं महागात; पोलिसांची कारवाई


हायलाइट्स:

  • यात्रा-जत्रांना परवानगी नसतानाही केलं आयोजन
  • मिरज ग्रामीण पोलिसांनी आयोजकांवर केली कारवाई
  • पोलिसांनी सात जणांवर दाखल केले गुन्हे

सांगली : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रा-जत्रांना परवानगी नसतानाही मिरज तालुक्यातील भोसे येथे यल्लमा देवीची यात्रा भरवल्याबद्दल, तसंच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल मिरज ग्रामीण पोलिसांनी आयोजकांवर कारवाई केली आहे. (Bullock Cart Race In Maharashtra)

प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी संजय शामराव मलमे (वय ५२), सूरज कुमार देवकाते (वय २२), गणेश प्रकाश जगदाळे (वय २८), अभिजीत सुरेश मोरे (वय २७), ऋषिकेश संजय मलमे (वय २५), चैतन्य सुरेश बंडगर (वय २६) आणि किरण नेमिनाथ वाळवे (वय ३२, सर्व रा. भोसे, ता. मिरज) या सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Omicron in Maharashtra Update : महाराष्ट्रात अजूनही ओमिक्रॉनपेक्षा डेल्टा व्हेरियंटचा कहर; ‘त्या’ रिपोर्टमधून खुलासा

याबाबत अधिक माहिती अशी की, भोसे येथे ग्रामस्थांनी आज यल्लमा देवीच्या यात्रेचे आयोजन केलं होतं. वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रा, जत्रांसह कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून भोसे गावात यात्रा आणि बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आलं. आज पहाटे यल्लमा देवी मंदिराच्या पाठीमागे बैलगाडा शर्यत पार पडली. शर्यत पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. तसंच शर्यतीत बैलांना मारहाण देखील करण्यात आली.

आई- वडिलांचं भांडण इतकं विकोपाला गेलं की तीन वर्षांचा मुलगा झाला पोरका

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसंच यात्रेत गर्दी केल्यास ग्रामस्थांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, गावात पोलीस पोहचताच बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांनी धूम ठोकली. संबंधितांना अटक करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांनी दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: