माहेरी गेलेल्या बायकोचा नांदायला येण्यास नकार, हताश झालेल्या नवऱ्याचं धक्कादायक पाऊल


हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील शेतकरी कुटुंबात असलेले मंगेश परशुराम खंदारे वय २३ वर्ष या तरुणाने स्वत:च्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीने नांदायला येण्यास नकार दिल्याने मंगेशने टोकाचं पाऊल उचललं.

मंगेश यांचा मृतदेह स्वतःच्या शेतातील एकाच लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. हा सर्व प्रकार आज उघडकीस आल्यानंतर गावकरी व कुटुंबांनी शेताकडे धाव घेतली. मंगेश यांच्या विवाह झालेला असून पत्नी नांदायला येत नसल्यामुळे मंगेश हा मागील काही दिवसापासून नैराश्यामध्ये होता. शेवटी हताश झालेल्या मंगेश खंदारे यांनी स्वत:च्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

मंगेशच्या आत्महत्येच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन मंगेशचा मृतदेह खाली उतरवला. सध्या या प्रकरणी हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

मंगेशची गावामध्ये अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा व शांत मुलगा म्हणून ओळख होती. त्याच्या जाण्याने खंदारे कुटुंबीयांवर आणि गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: