बडतर्फ एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; धावत्या कारखाली उडी घेतलीअकोलाः अकोला ते अकोट मार्गावर देवरी फाट्यानजीक शहादा डेपो एस टी कर्मचारी अरविंद चव्हाण यांनी धावत्या कार खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना देवरी नजीक घडली आहे. रविवारी ही घटना समोर आली आहे. तसंच, तो मानसिकदृष्ट्या आजारी होता, अशी माहितीही समोर येत आहे.

एसटी महामंडळाच्या संपात सहभागी असलेल्या एका एसटी कर्मचाऱ्यांनी कार खाली येऊन आत्महत्या केल्याची घटना अकोला जिल्ह्यात घडली आहे. ही घटना अकोला अकोट मार्गावर १६ जानेवारी रोजी घडली आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव अरविंद चव्हाण असं आहे. तो शहादा आगारात चालक पदावर कार्यरत होता. संप काळात त्याची बदली शहादा डेपो येथून साक्री डेपो येथे झाली होती. संपात सहभागी असलेला कर्मचारी हा गेल्या ५ ते सहा महिन्यापासून मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेला होता. त्यामुळं त्याला खात्यातून बडतर्फही करण्यात आले होते.

वाचाः
अरविंद चव्हाण हा त्याच्या मूळगावी देवरी येथे राहात होता. एसटी चालक अरविंद चव्हाण यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने तो नेहमी फिरत होता. फिरत असतानाच त्याने अकोट रोडवरील देवरी फाट्यानजीक रस्त्यावरील चालत्या वाहनासमोर उडी घेतली आणि या वाहनांच्या धडकेत तो गंभीररित्या जखमी झाला होता. ज्या वाहनासमोर त्याने उडी घेतली त्याच वाहनाने त्याला उपचारासाठी अकोट येथे नेऊन त्याला भरती करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती दहीहंडा पोलिसांनी दिली आहे.

वाचाःSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: