बूस्टर डोसनंतरही करोनाची लागण; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती


हायलाइट्स:

  • ६० वर्षांवरील नागरिकांना बुस्टर डोस
  • तरीही, करोनाची लागण
  • तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

औरंगाबादः राज्यातील करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतान, लसीकरणाची मोहीम सुद्धा वेगाने सुरू आहे. त्यातच ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दोन डोस घेणाऱ्या व्यक्तींना आता बूस्टर डोस सुद्धा दिला जात आहे. मात्र बूस्टर डोस घेतल्यानंतरही काही जण करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने समोर आलं आहे.

करोनाची संभाव्य तिसरी लाट आणि ओमिक्रॉन संसर्गाचे वाढते रुग्ण यामुळं ६० वर्षांवरील अधिक वयाच्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात सुरुवात झाली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका बघता फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांहून अधिक वय असलेल्यांना व सहव्याधी (कोमॉर्बिड) रुग्णांना बुस्टर डोस देण्या येणार आहे. मात्र, बुस्टर डोसनंतरही काहींना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

वाचाः गजबजलेल्या रस्त्यावर ऊसाने भरलेली ट्रॉली उलटली अन्…

औरंगाबाद महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना सांगितले की, बूस्टर डोस घेतल्यानंतर खूप लोकांना करोना झाला असं काही चित्र नाही. आमच्याकडे असलेल्या काही एक-दोन लोकांना बूस्टर डोस घेतल्यानंतर करोनाची लागण झाली आहे. मात्र त्यांना सौम्य अशी लक्षणे असून, ते होम आयसोलेशन मध्ये आहेत. त्यामुळे काळजी करण्याची कोणतेही कारण नसून, लसीकरण केल्याने करोनाची लक्षणे जाणवत नाही, असेही मंडलेचा म्हणाले.

वाचाः मातंग समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

लसीकरण महत्वाचे…

करोनाला हरवण्यासाठी आणि त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करावे असेही मंडलेचा यावेळी म्हणाले. तर बूस्टर डोस घेतल्यानंतर ही करोना झालेल्या रुग्णांना सौम्य लक्षणे असून कोणताही त्रास होत नाहीये आणि हे फक्त बूस्टर डोस घेतल्यामुळे झाला आहे असंही, मंडलेचा म्हणाले.

वाचाः हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट, बाधितांचा आकडा वाढलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: