पाणी आणि पिकांसाठीचे स्वातंत्र्य देणाऱ्या योजनेत सर्वांच्या समावेशास लक्ष द्या

पाणी आणि पिकांसाठीचे स्वातंत्र्य देणाऱ्या योजनेत सर्वांच्याच समावेशासाठी लक्ष द्या – डॉ .भारत पाटणकर – आनंदरावबापू पाटील

आटपाडी / प्रतिनिधी,दि.२१/०१/२०२२ – कुटुंबाला जास्तीत जास्त समृद्धी मिळविण्यासाठी पाणी वापरण्याचे आणि त्यासाठी आवश्यक ती पिके घेण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या आणि जगात पहिला ठरणाऱ्या बंदिस्त पाईपलाईन च्या आटपाडी तालुक्यातल्या पथदर्शी प्रयोगाचा लाभ घेणाऱ्यात तालुक्यातील सर्वच्या सर्व शेतकरी आणि भूमिहीन यांचा समावेश व्हावा यासाठी प्रत्येकाने डोळसपणे काम करत सर्व समावेशक पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात असे आवाहन डॉ.भारत पाटणकर, आनंदरावबापु पाटील यांनी केले .

  पाणी चळवळ आणि श्रमिक मुक्ती दल यांच्यावतीने मापटे मळा येथे आयोजित बैठकीत डॉ.भारत पाटणकर,आनंदरावबापु पाटील बोलत होते.

  यावेळी पाणी चळवळीचे नेते सादिक खाटीक, माजी उपसभापती अशोक माळी, नानासाहेब माळी सुखदेव माळी, शंकर ढोले,शिवाजीराव फुले,दत्तात्रय आडसूळ, बजरंग हाके, बापू फुले, राजु फुले, दत्तात्रय फुले, सोमनाथ माळी, मधूकर माळी, बाळासाहेब माळी, दगडु फले, शंकर जाधव, सुशांत जाधव, सतिश माळी,विजय माळी,महादेव आडसूळ,अमोल माने सर,अभिमान खिलारी,भिमराव यमगर,अजय महारनूर, दादासाहेब वाकसे,पांडुरंग दडस,जलसंपदाचे शाखा अभियंता श्री.लोंढे,पाणी वापर संस्थाचे कॉन्ट्रॅक्टर श्री.घाणेकर आदी उपस्थित होते.

    क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली चळवळीने दिलेल्या लढ्याचा इतिहास डॉ. भारत पाटणकर,आनंदरावबापु पाटील यांनी सांगितला. 

यावेळी सादिक खाटीक, माजी उपसभापती अशोक माळी यांची भाषणे झाली .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: