राजकीय न्यूज

आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून म्हसवड परिसरातील शेतकऱ्यांसाठी पी.एम.किसान योजना शिबिर

पी.एम.किसान योजना शिबिरामुळे शेतकऱ्यांना फायदा मोठ्या प्रमाणावर झाला

म्हसवड ता.माण / ज्ञानप्रवाह न्यूज –आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून म्हसवड परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी पी.एम.किसान योजना शिबिर आयोजित करण्यात आले होते.या संधीचा फायदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी घेतला.

म्हसवड ता.माण येथे पी एम किसान योजनेचे शिबीर नुकतेच संपन्न झाले.पी एम किसान योजना सुरु झाल्यापासून हजारो लोकांना पी एम किसान चे सरकारी हफ्ते मिळत नव्हते वारंवार लोक तक्रारी आमदार जयकुमार गोरे सांगत होते.शेतकरी बांधवांना दहिवडी येथे जावे लागत होते.

त्या गोष्टीचा विचार करून आमदार जयकुमार गोरे यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांची बैठक घेऊन सूचना देऊन शिबीर म्हसवड तलाठी कार्यलयात घ्यावयाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोस्ट ऑफिस, कृषी अधिकारी,महसूल अधिकारी यांनी नियोजन करून सलग 3 दिवस 4 तारीख ते 6 तारखेपर्यंत तलाठी कार्यलय येथे शिबीर संपन्न झाले. सुमारे 1100 लोकांचे त्रुटी असणारी प्रकरणे यामुळे मार्गी लागली. या शिबिरामुळे म्हसवड परिसरातील नागरिक आमदार जयकुमार गोरे यांना धन्यवाद देत आहेत.

या शिबिराला माण चे तहसीलदार विकास अहिर,तालुका कृषी अधिकारी वैभव लिंगे, उपस्थित होते. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी तलाठी श्री.आकडमल ,गुलाब उगलमोगले, मंडळ कृषी अधिकारी श्री.बनसोडे,कृषी सहायक श्री.कुंभार,श्री.लोखंडे, महसूल कर्मचारी वैभव लावंड,दुर्योधन केंगार,विजय ढेबरे,अंगुली बनसोडे ,शरद नाळे यांनी समस्यांचे निराकारण केले.म्हसवडचे माजी नगराध्यक्ष तथा अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी,अकील काझी,बंडू धट,संजय सोनवणे,सुरेश म्हेत्रे,आकाश पिसे,आकाश मेंढापुरे, अविनाश चव्हाण आदींनी जनजागृती करून शिबीर यशस्वी करण्या साठी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *