मंगळवेढा ,ता.5 /ज्ञानप्रवाह न्यूज :- प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे सर्वर मुदत वाढूनही डाऊन झाल्यामुळे पिकविम्या च्या नवीन नोंदणीचे काम बंद असून शेतकरी पिक विमा नोंदणीसाठी रात्रीच्या वेळी देखील सीएससी केंद्रावर थांबू लागले.
तालुक्यातील शेतकऱ्यांना उत्पादित मालाला बाजारभावा बरोबरच कमी पाऊस किंवा अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीं मुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक शासकीय मदत ही अल्प असते आणि काहीवेळा तर तीही मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांचा ओढा हा पिक विमा भरण्याकडे असतो मात्र गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र शासनाने एक रुपयात पिक विमा योजना राबवली याला तालुक्यातील शेतकऱ्याकडून मोठा प्रतिसाद मिळाला. यंदा पैसे भरून विमा प्रस्ताव दाखल केले जात आहेत अजून 1476 शेतकरी गतवर्षीच्या भरपाईपासून वंचित आहेत. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी विमा कंपनी कडून होणारे बदल व सूचना न देता शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रताप करत असल्याने यंदा शेतकऱ्यांचा विमा भरणाकडे कल कमी आहे.प्रधानमंत्री फसल बीमा योजने साठी प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 31 जुलै होती मात्र शेतकरी संख्या कमी झाल्यामुळे 14 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ दिली मात्र त्या पोर्टलवर आधार चा सर्वर डाऊन झाल्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहेत, सर्वर सुरू होण्याच्या आशेपोटी शेतकरी रात्री उशिरापर्यंत केंद्रावर थांबून आहेत.
31 जुलै च्या मुदतीत विमा प्रस्ताव दाखल करण्यापासून अनेक शेतकरी वंचित होते मात्र मुदत वाढ दिल्याने त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी सर्वर सातत्याने डाऊन होत असल्यामुळे पिक विमा प्रस्ताव दाखल करण्यासाठी देखील शेतकरी थांबले आहेत सर्वर कधी सुरू होणार याबाबत मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत – गिरीश पाटील सीएससी सेंटर चालक मारोळी
दरवर्षी सर्वर डाऊन होण्याचा प्रश्न निर्माण होतो याचे अधिकाऱ्यांना कल्पना स्थान देखील अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत म्हणून मुदतवाढ देण्याची नामुष्की कंपनीवर येते त्यासाठी विमा प्रस्ताव दाखल करण्याच्या कालावधीत सर्वर कायम चालू राहणे आवश्यक आहे– श्रीमंत केदार तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना