महात्मा बसवेश्वरांना अनोखे अभिवादन; रक्तदानातून समाजसेवेचा संदेश

बसवेश्वर जयंतीनिमित्त पंढरपूरात रक्तदान शिबिर; 40 जणांचा सहभाग

महात्मा बसवेश्वरांना अनोखे अभिवादन; रक्तदानातून समाजसेवेचा संदेश

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज|शुभम लिगाडे,दि.१७ एप्रिल : महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 895 व्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आले.

 

भर उन्हाच्या तीव्रतेची पर्वा न करता एकूण 40 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. या माध्यमातून त्यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांना मानवसेवेच्या कार्यातून अभिवादन केले. रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना पाण्याचा जार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या सामाजिक उपक्रमात श्वेता डोंबे, सुनिता लिगाडे, दिपाली ठिगळे, आरती बसवंती, निलराज डोंबे, राजेश्वर लिगाडे, महेश विभुते, सुरज पावले, मयुर भिंगे, गंगाधर स्वामी, सागर स्वामी, प्रशांत मेनकुदळे, गिरीश पंतोजी-पाटील, ओंकार बसवंती आदींसह वीरशैव लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.हे रक्तदान शिबीर श्री. मन्मठ स्वामी येथे यशस्वीरीत्या पार पडले.

Leave a Reply

Back To Top