राज्यातील जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी एक कोटीचे विमा सुरक्षा कवच
सोलापूर पॅटर्न राज्यात राबविणार – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
सुरक्षा कवच व केंद्र प्रमुख पदस्थापनेबद्दल जिल्हा परिषदेचे कौतुक
सोलापूर | ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा परिषदेने दहा हजार पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांना विमा सुरक्षा कवच प्रदान करून राज्यात विशेष उपद्रव राबविला आहे. राज्यातील ग्रामविकास विभाग अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी १ कोटी रूपये सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच प्रदान करणेत येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास व पंचायराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज केंद्र प्रमुख पदी निवड झालेल्या केंद्रप्रमुख पदस्थापनेचे आदेशाचे वितरण व जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी सॅलरी सुरक्षा कवच करार व जिल्हा परिषद पदाधिकारी यांना नवीन वाहनाचे चावी प्रदान आज ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते करणेत आला.याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे,जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य हे होते.

या सभेस उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार,समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते,कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला बाल कल्याण समितीचे सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यंकांत भुजबळ,जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड,कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर , कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक आनंदकुमार काटकर, मुख्य व्यवस्थापक अनिकेत शिवडेकर, ट्रेझरी शाखेचे व्यवस्थापक अतुल मगदुम, अतिरिक्त मुख्य लेखा वित्त अधिकारी शशीकिरण उबाळे , लेखाधिकारी मिरगळे प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा परिषदेचे प्रागंणात जिल्हा परिषद अध्यक्ष जयकुमार गोरे व उपाध्यक्ष इंद्रजित पवार व समितीचे सभापती व पंचायत समितीचे सभापती यांना नवीन वाहनाचे चावी प्रदान पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकारी व कर्मचारी सॅलरी पॅकेज विमा सुरक्षा कवच करार व केंद्र प्रमुख पदस्थापना आदेशाचे वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रारंभी प्रास्तविक मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे व शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी प्रास्तविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे यांनी १० हजार पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी यांना या विमा सुरक्षा कवचाचा लाभ होणार आहे. सोलापूर जिल्हा परिषद राज्यात पहिली जिल्हा परिषद असून हा करार होत असल्याचे सांगितले.१ कोटी रूपये विमा कवच व इतर लाभ मिळणार असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांनी १ कोटींचे विमा कवच – ना. जयकुमार गोरे
सोलापूर जिल्हा परिषदेने सर्वसामान्यांना सेवा देत असताना अधिकारी व कर्मचारी यांना सुरक्षा कवच देऊन राज्यात आदर्श निर्माण केला आहे. सिईओ कुशल जैन व मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे यांचे अभिनंदन केले. हा उपक्रम राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणारे कर्मचारी यांचे साठी राबविणेत येणार आहे. अपघातात अपंगत्व आल्यास अंपगत्वाच्या टक्केवारी नुसार जास्तीत जास्त ८० लक्ष रूपये, अपत्यांचे विवाहासाठी आर्थिक मदत, एका अपत्याचे उच्च शिक्षणासाठी १० लक्ष मदत असे विविध सुरक्षा कवच देणारा हा नाविण्यपुरिण उपक्रम राज्यात राबविणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले.
राज्यात केंद्र प्रमुख यांचे जागा भरा म्हणून आज मला चार निवेदने प्राप्त झाली. परंतू ही प्रक्रिया सोलापूर जिल्हा परिषदेने करून पदस्थापना आदेश वितरीत केल्याबद्दल शिक्षण सभापती चेतनसिंह केदार व सिईओ कुशल जैन व प्रशासन व शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. चारचाकी वाहनांचा उपयोग जनतेच्या सेवा अधिक सुलभ होणे साठी करावा. सोलापूर सारख्या ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या जिल्ह्याचे अध्यक्षपद मिळालेले दिपक वैद्य यांचे देखील अभिनंदन करून सर्व पदाधिकारी यांनी विकासास गती देण्याचे आवाहन केले.

