coal crisis in india : कोळसा संकट गडद! देशातील १५ वीजनिर्मिती प्रकल्पांकडे एक दिवसाचाही साठा नाही, रोजच्या पुरवठ्यावर अवलंबून
राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि झारखंडमधील प्रत्येकी एका वीजनिर्मिती प्रकल्पाला कोळशाच्या कमतरतेचा सामना करावा लागतोय. म्हणजेच या वीजनिर्मिती प्रकल्पांना होणाऱ्या कोळशाच्या पुरवठ्यात अडथळा किंवा कमतरता आली तर या त्यातील वीजनिर्मिती थांबेल.
वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये सरासरी २० दिवसांपेक्षा अधिकचा कोळशाचा राखीव साठा असतो. या १५ वीजनिर्मिती प्रकल्पांची क्षमता १५,२९० मेगावॅट इतकी आहे. या १५ वीजनिर्मिती प्रकल्पांशिवाय इतर अनेक प्रकल्पांची स्थितीही गंभीर आहे. ३५३६० मेगावॅट क्षमतेच्या एकूण २७ वीजनिर्मिती प्रकल्पांकडे फक्त एक दिवसाचा कोळशाचा साठा शिल्लक आहे. त्याचवेळी २० प्रकल्पांकडे फक्त २ दिवसांचा आणि २१ प्रकल्पांकडे फक्त ३ दिवसांचा कोळशाचा साठा शिल्लक आहे.
coal shortage : कोळसा मंत्र्यांनी दिले उत्तर; म्हणाले, ‘…. पण राज्यांनी तसं केलं नाही’
या वीजनिर्मिती प्रकल्पांची एकूण उत्पादन क्षमता ४९७६९ मेगावॅट इतकी आहे. याशिवाय २० प्रकल्पांकडे ४ दिवस, ५ प्रकल्पांकडे ५ दिवस आणि ८ प्रकल्पांमध्ये ८ दिवसांचा साठा आहे. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशातील दादरी येथील केंद्राच्या औष्णिक वीज प्रकल्पात ११ ऑक्टोबरला कोळशाची मागणी १९००० टन होती. तर पुरवठा केवळ १८००० टन इतकाच झाला. ११ ऑक्टोबरला उत्तर प्रदेशातील खांबेरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्पाला कोळशाचा पुरवठा होऊ शकला नाही.
Coal and Power Crisis: कोळसा संकटात देशवासियांच्या मदतीला रेल्वे धावली!
वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा साठा न करणं, वीजनिर्मिती प्रकल्पांकडे कोळसा कंपन्यांची देणी आणि कोळशाच्या वाहतुकीतील समस्या आणि विलंब यासारख्या कारणांमुळे वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा कमी पुरवठा होत असल्याचं वेबसाइटवर म्हटलं आहे.