सोलापूर मतदारसंघाच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मतदान करा- आ.विजयकुमार देशमुख

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा सोलापूरमध्ये कमळाला पाठिंबा

सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.30/04/2024- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्याला सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते उपस्थित राहिले होते.

माजी मंत्री आणि उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याप्रसंगी सर्व उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वालाच पुन्हा संधी देण्याचा निर्धार व्यक्त केला.

भाजपा केमिस्ट प्रकोष्ठ व शहर संयोजक सचिन कुलकर्णी यांनी संपूर्ण केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने स्वागतपर सत्कार केला.

यावेळी माजी मंत्री आणि उत्तर सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मार्गदर्शन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आपला देश चांगली कामगिरी करत असून वैद्यकीय क्षेत्रात मोठी भरारी घेतली असल्याची माहिती दिली. येणाऱ्या काळात तुम्हाला सोलापूर मतदारसंघात अनेक विकासकामे पाहायला मिळतील, सोलापूर मतदारसंघाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोठ्या संख्येने मतदान करा, असे आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.

मी तुमच्या परिवाराचा एक सदस्य असून आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर राहणार असून आपण सर्व फार्मासिस्टच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव कटिबध्द राहीन अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी दिली.

आपल्या देशाच्या आणि सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी देऊया असा संकल्प यानिमित्ताने करूयात.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वेंकटेश पुजारी, जिल्हा सचिव राजेश विरपे, शहर अध्यक्ष विलास कारभारी,भाजपा महाराष्ट्र केमिस्ट प्रकोष्ठ संयोजक श्रीकांत दुबे,भाजपा पश्चिम महाराष्ट्र केमिस्ट प्रकोष्ठ अध्यक्ष बसवराज मणुरे तसेच केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *