पांडुरंग परिवाराचा एकच निर्धार ,पुन्हा एकदा मोदीजींचा शिलेदार
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२३/०४/ २०२४- सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवार कार्यकर्ता विचार विनिमय बैठकीला महायुतीचे भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते उपस्थित होते.यावेळी पांडुरंग परिवाराने स्वागत करत सत्कार केला.
याप्रसंगी बोलताना तुम्हीच भावी खासदार सर्व पांडुरंग परिवार तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही मा.आ.प्रशांत परिचारक यांनी दिली.
मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या बैठकीत सर्व उपस्थितांनी सोलापूर मतदारसंघातून एक कमळ दिल्लीत पाठवण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्याचा निर्धार केला.
यावेळी मा.आ.प्रशांत परिचारक यांनी बैठकीला मार्गदर्शन करत सोलापूर मतदारसंघात होत असलेल्या कामांची माहिती दिली.गेल्या १० वर्षामध्ये मतदार संघात रस्ते, पाणीपुरवठा अशा अनेक बाबतीत चांगल्याप्रकारे कामे झाली आहेत. गावागावांत अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. आपल्या सोलापूरच्या सर्वागीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीं शिवाय पर्याय नाही.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीं ना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिलेदाराला म्हणजेच रामभाऊ सातपुतेंना मोठ्या संख्येने विजयी करा, असे आवाहन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.
मी सोलापूर मतदारसंघाच्या परिवाराचा सदस्य असून माझ्या परिवाराच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील असणार आहे. येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये सोलापूरच्या विकासाचे व्हिजन तयार करून अनेक विकासकामांना मार्गी लावणार असल्याची ग्वाही सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातील विकसित राष्ट्रासाठी तसेच सोलापूरच्या विकासासाठी एक बहुमोल मत महायुतीच्या उमेदवारालाच द्यायचे आहे’, असे आवाहन यावेळी बोलताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केले.
याप्रसंगी चेअरमन शिवानंद पाटील, बाबासाहेब पाटील, रामकृष्ण नागणे,युनूस शेख,नंदकुमार हावणाळे,सुदेश जोशी, काशिनाथ पाटील,भारत पाटील,सुधीर करंदीकर,शिवाजी घोडके,जगन्नाथ कोकरे, नामदेव जानकर, रामभाऊ माळी, भुजंगराव आसवे, जालिंदर व्हणुषगी, जम्मा जगदाळे, औदुंबर वाडदेकर, कांतीलाल ताटे,राजेंद्र चरवूकाका पाटील,डॉ.शरद शिर्के,हरिभाऊ यादव, बाळासाहेब यादव, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे,महादेव लुगडे,गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, रेवणसिंहर लिगाडे, तानाजी कांबळे, अशोक माळी, राजाराम कोळी, उत्तम घोडके, पप्पू स्वामी, विष्णू मासाळ, बबलू सुतार, राजू पाटील, सुरेश जोशी, पिटू शिंदे, विठ्ठल बिराजदार, सचिन चौगुले, अर्जुन शिरोळे, प्रा.डी.वाय.पाटील, दत्ता नागणे,श्रीकांत साळे,बिरू घोगरे,मधवांनर आकळे,भारत लेंडवे, श्रीकांत गणपाटील, सिद्धेश्वर मेटकरी, भागवत माळी, भागवत घुसे,सिद्धेश्वर पाटील, बाळासाहेब चौगुले तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------