
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज
सामाजिक बांधिलकीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश… पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे मागील काही वर्षांपासून वृक्षारोपणाचा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास दोनशेहून अधिक वृक्षांची लागवड करून जतन व संवर्धन केली आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड,पिंपळ,कदंब,चिंच, बहावा,जांभूळ,करंज,लिंब,आंबा,बकुळ, उंबर, रेन ट्री इत्यादी लागवड करण्यात आली…