वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज

सामाजिक बांधिलकीतून वृक्षसंवर्धनाचा संदेश…

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे मागील काही वर्षांपासून वृक्षारोपणाचा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येत आहे.

आतापर्यंत जवळपास दोनशेहून अधिक वृक्षांची लागवड करून जतन व संवर्धन केली आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड,पिंपळ,कदंब,चिंच, बहावा,जांभूळ,करंज,लिंब,आंबा,बकुळ, उंबर, रेन ट्री इत्यादी लागवड करण्यात आली आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल प्रदूषणामुळे बिघडत आहे. वृक्षाअभावी तापमानात मोठे विघातक बदल होत आहे. त्यामुळे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज आहे.

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की, संविधानाच्या कलम ४८ अ नुसार पर्यावरणाच्या संरक्षणाचा आणि नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराशी थेट संबंध आहे. नैसर्गिक दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी वृक्षारोपण, जतन वृक्षसंवर्धन अत्यंत गरजेचे आहे.वायु प्रदूषण कमी करणे, ऑक्सिजन वाढ,कार्बनडाय ऑक्साईड नाश, तापमान कमी करणे,जमिनीची धूप थांबविणे इत्यादी कारणासाठी वृक्षारोपण, संवर्धन व जतन गरजेचे आहे.

मानवाचे पूर्ण जीवन निसर्गावर अवलंबून आहे.निसर्गातील महत्त्वाचा घटक झाडे वृक्ष आहेत.पंढरीतील डाॅ.आंबेडकर नगरात येणाऱ्या पाच वर्षात एक हजार झाडे लावून जतन संवर्धन करण्याचा संकल्प आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून केला आहे – रवी सर्वगोड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *