अहमदनगर येथे सैन्य अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन
पुणे,जिमाका: यांत्रिकी पायदळ केंद्र आणि शाळा, (पंकज जोशी स्टेडियम) अहमदनगर येथे १४ डिसेंबर ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत पुरुष आणि महिलांकरीता सैन्य अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

या मेळाव्याअंतर्गत अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील निवड झालेल्या पुरुष उमेदवारां करीता मुख्यालय रिक्रूटिंग झोन पुणे यांच्या अंतर्गत अग्निवीर भरती मेळावा महाराष्ट्र आणि गुजरात, गोवा ,दमण, दीव आणि दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश या राज्यांतील निवड झालेल्या सुमारे ७ हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
तरी पात्र उमेदवारांनी अहमदनगर येथे उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स.दै. (नि.) यांनी केले आहे.


