पंढरपूर तालुका पोलिसांची धडक कारवाई : भीमा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो जप्त,६.१५ लाखांचा मुद्देमाल ताब्यात
पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३ फेब्रुवारी २०२६- अवैध वाळू वाहतुकीविरोधात पंढरपूर तालुका पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई करत ६ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे.
दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ६५ एकर जॅकवेल परिसर भीमा नदी पात्र येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी विसावा तीन रस्ता चौक येथे टेम्पो क्रमांक MH 11 DD 5899 अडवून चालक आदित्य मनोज माने रा.अंबाबाई पटांगण,रा.व ता.पंढरपूर यास ताब्यात घेतले. संबंधित टेम्पोमधून महाराष्ट्र शासनाच्या मालकीची वाळू अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी चालक व टेम्पो मालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम ३०५ व ३०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून वाळूसह अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो असा एकूण ६,१५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर , पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर,पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोहेकॉ मंगेश रोकडे,पोहेकॉ अभिमन्यू गरड,पोहेकॉ सुहास देशमुख,दीपक भोसले,पोकॉ संजय गुटाळ ,सागर गवळी, विजयकुमार आवटी पोलीस चालक चाटे, विलास घाडगे,हासन नदाफ यांच्या पथकाने ही धडक कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त कायम राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
