तीर्थक्षेत्र, देवता,संत,अभंग व पवित्र वारी यांचा अवमान सहन करणार नाही
वारीत नास्तिकतावाद व अर्बन नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्यांवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे -समस्त वारकरी संप्रदाय व संघटना

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१.०६.२०२५: महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनात पंढरपूरच्या वारीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत सोपानकाका आणि अन्य थोर वारकरी संतांनी या वारीच्या माध्यमातून समाजाला जीवनाचे सार्थक करण्याचे ज्ञान दिले. मात्र काही अपप्रवृत्ती वारीच्या या पवित्र परंपरेत घुसखोरी करून संत साहित्य, अभंग,धर्मग्रंथ व वारकरी श्रद्धास्थानांविषयी अपप्रचार करत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवादा च्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. समरसता यांच्या नावाखाली काम करणारे तथाकथित तसेच नक्षलवादी कारवायांमध्ये ज्यांचे कार्यकर्ते पकडले आहेत अशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कबीर कला मंच यांसह इतर पुरोगामी शिरले आहेत. त्यांच्यावर अर्बन नक्षलवादाचे गुन्हे नोंद आहेत. ही गोष्ट शासन-प्रशासनाने गांभीर्याने घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी वारकरी संप्रदाया च्यावतीने या गैरप्रकारांवर युवा वारकरी लक्ष ठेवतीलच परंतु अर्बन नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्यांवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार संतवीर बंडातात्या कराडकर यांसह वारकरी संत, ह.भ.प. आणि मान्यवरांनी केले आहे.समस्त वारकरी संप्रदाय, संस्थान, संघटना व हिंदु जनजागृती समिती वतीने पुणे येथील श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

इंद्रायणी-चंद्रभागा या पवित्र नद्यांचे प्रदूषण, वारकर्यांच्या तीर्थक्षेत्री कायमस्वरूपी मद्य- मांस विक्री बंद करण्यात यावी.नक्षलवादाचा आरोप असणार्या संघटनांचे मुखवटे काढून त्यांचे खरे चेहरे उघड केले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये नक्षलवादाच्या आरोपाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद झाले आहेत.हे वारीच्या माध्यमातून अंनिस, कबीर कला मंच, पुरोगामी छुपा अजेंडा राबवत आहेत. अर्बन नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केली.
या वेळी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, श्रीक्षेत्र देहूचे माजी अध्यक्ष ह.भ.प. नितीन मोरे महाराज आणि ह.भ.प. वैभव महाराज मोरे, संत सोपानकाका पालखी सोहळा दिंडी समाज अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज कदम, अखिल भारतीय संत समितीचे प्रदेश महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, चिंतामणी प्रासादिक दिंडींचे ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज आणि अन्य संत-महंत उपस्थित होते.

वारकरी संप्रदायाची झुल पांघरून त्यांची बदनामी करणार्यांना वारीत प्रतिबंध घाला अशी मागणी संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केली.
देहूप्रमाणे वारकर्यांच्या सर्व तीर्थक्षेत्री कायमस्वरूपी मद्य-मांस मुक्त करावीत अशी मागणी ह.भ.प.नितीन महाराज मोरे यांनी केली.
वारकरी संप्रदायाच्या विचारधारेविरोधी कार्य करणार्यांना जशास-तसे उत्तर देण्यास वारकरी सक्षम आहे असे ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी यांनी सांगितले.
संत,महापुरुष यांवर टिका करणार्यांच्या विरोधी त्वरित कायदा करावा ह.भ.प. राम महाराज कदम यांनी मागणी केली.
वारीत जातीयवादाचा पसरवणार्यांचा बुरखा फाडण्यासाठी प्रयत्नरत राहू असे ह.भ.प. भगवान महाराज कोकरे म्हणाले.