कसबा गणपतीची महाआरती उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न

कसबा गणपतीची महाआरती उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न,महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९ ऑगस्ट २०२५- पुणे शहराच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक असलेल्या आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या महाआरतीचा सोहळा महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला.हा कार्यक्रम डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने तसेच सौ.सोनाली डांगे यांच्या श्री शक्ती प्रतिष्ठानच्या नियोजनातून आयोजित करण्यात आला होता.

या महाआरतीत शिवसेना महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहसंपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत,माजी नगरसेविका प्रतिभा रवींद्र धंगेकर,उपशहर प्रमुख श्रद्धा शिंदे, सुरेखा कदम,अभिनेत्री मीरा सारंग तसेच कार्यकर्त्या साक्षी रायकर, जानवी घंटी, प्रीती मेरवाडे, पूनम कुरपे आणि लता लेंबे यांचा समावेश होता. सर्व भगिनींनी एकत्र येऊन श्रद्धा, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.

समारंभात बोलताना डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या,महिलांची सुरक्षितता ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून आपले सामूहिक कर्तव्य आहे.विशेषतः विसर्जन मिरवणुकीदरम्यान महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक सक्षम उपाय योजना आवश्यक आहेत.कसबा गणपती मंडळाच्या विकास कामांसाठी शासनाने अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

त्यांनी महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम व्हावा आणि जनतेच्या सर्व समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी प्रार्थना केली.महायुती सरकार वर विश्वास व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नांमुळे स्त्रीशक्तीला चालना मिळत असल्याचे नमूद केले.

मी स्वतः २५ वर्षांपासून गणेश आरतीत सहभागी होत आहे. आजही याच श्रद्धेने आणि विश्वासाने सांगू इच्छिते की आपण सर्वजणी एकत्र राहून समाजातील प्रश्न सोडवण्याचा संकल्प पाळूया.जय महाराष्ट्र! अशा निर्धारपूर्ण शब्दांत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या भव्य महाआरतीचा समारोप महिलांच्या एकजुटीचा,श्रद्धेचा आणि सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटवत करण्यात आला.

Leave a Reply

Back To Top