एन.ए.बी.निवासी अंधकार्यशाळेला सुशीलकुमार शिंदे यांचे नाव


सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज-जिल्ह्यातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा कर्णिक नगर सोलापूर येथील निवासी अंध कार्यशाळा या संस्थेचे नाव आता ज्येष्ठ नेते यांच्या नावाने सुशीलकुमार शिंदे दिव्यांग (दृष्टीबाधित) निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र,सोलापूर असे अधिकृतरित्या नामकरण करण्यात आले आहे.

या नामकरणाचा कार्यक्रम सुशीलकुमार शिंदे यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवार दि.४ सप्टेंबर रोजी सकाळी १०-३० वाजता एन.ए.बी.निवासी अंधकार्यशाळा कर्णिकनगर या ठिकाणी श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते नॅब संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश यलगूलवार आणि बालरंगभूमी परिषदेचे कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला अशी माहिती संस्थेचे अधीक्षक रामचंद्र कुलकर्णी यांनी दिली.


नॅब संस्थेने फार पूर्वी पाठवलेला नामांतरांचा प्रस्ताव होता.हा प्रस्ताव शासनाने मान्य करून सोलापूरच्या विकासावर व दिव्यांग सेवेवर असलेला सुशीलकुमार शिंदे यांचा विश्वास आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.संस्थेच्या सर्व कार्यकर्त्या आणि विद्यार्थ्यांसाठी हा एक अत्यंत आनंदाचा आणि अभिमानास्पद क्षण आहे. हे केवळ एक नामकरण नाही, तर एक कृतज्ञताप्रदर्शन आणि सन्मानार्थ समर्पित करण्याचा प्रयत्न आहे,आता हे केंद्र केवळ एक प्रशिक्षण केंद्र राहणार नाही तर दिव्यांगासाठी समाजसेवेचा आदर्श वृत्तीचे एक सजीव स्मारक बनेल असे संस्थेचे जनरल सेक्रेटरी के.डी.पाटील यांनी सांगितले आहे.

