व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा; प्रेम, मैत्री आणि नात्यांचा उत्सव

व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा; प्रेम, मैत्री आणि नात्यांचा उत्सव

तरुणाईचा जल्लोष, बाजारपेठेत वाढलेली गर्दी; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

१४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा. शहरात तरुणाईची गर्दी, बाजारपेठेत वाढलेली खरेदी आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव. प्रेम, मैत्री आणि नात्यांचा खास दिवस.

१४ फेब्रुवारी रोजी जगभरात व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा करण्यात आला. प्रेम, मैत्री आणि आपुलकी व्यक्त करण्याचा हा खास दिवस असल्याने तरुणाईमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. शहरातील उद्याने, कॅफे, रेस्टॉरंट्स आणि शॉपिंग मॉल्समध्ये जोडप्यांची व मित्र-मैत्रिणींची मोठी गर्दी दिसून आली.

गिफ्ट शॉप्स, फुलांच्या दुकानांमध्ये गुलाब, ग्रीटिंग कार्ड्स, चॉकलेट्स आणि आकर्षक भेटवस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही विशेष ऑफर्स देण्यात आल्या होत्या.

सोशल मीडियावर #ValentinesDay आणि #LoveDay हे हॅशटॅग ट्रेंड झाले. अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना शुभेच्छा देत प्रेम व्यक्त केले. काही सामाजिक संघटनांनी हा दिवस प्रेम आणि आदराचा दिवस म्हणून कुटुंबातील नात्यांना अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.

व्हॅलेंटाईन डे कधी आणि कसा सुरू झाला ?

व्हॅलेंटाईन डेची सुरुवात रोमन साम्राज्यात झाली.व्हॅलेंटाईन डे ची ऐतिहासिक पार्श्वभूमी-इ.स.तिसऱ्या शतकात रोममध्ये सम्राट क्लॉडियस दुसरा याने सैनिकांना विवाह करण्यास बंदी घातली होती, कारण त्याच्या मते अविवाहित पुरुष चांगले सैनिक बनतात.

त्या काळात संत व्हॅलेंटाईन नावाच्या पाद्रीने या अन्यायकारक आदेशाला विरोध करून गुप्तपणे सैनिकांचे विवाह लावून दिले. हे समजल्यावर त्यांना अटक करण्यात आली आणि 14 फेब्रुवारी इ.स. 269 च्या सुमारास त्यांना फाशी देण्यात आली.

प्रेमदिन कसा झाला ?

नंतर त्यांच्या स्मरणार्थ 14 फेब्रुवारी हा दिवस “Saint Valentine’s Day” म्हणून ओळखला जाऊ लागला. मध्ययुगात इंग्लंड आणि फ्रान्समध्ये या दिवशी प्रेम व्यक्त करण्याची परंपरा सुरू झाली.हळूहळू हा दिवस संपूर्ण जगभर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून प्रसिद्ध झाला.

प्रेम म्हणजे फक्त दोन हृदयांचा मिलाफ नाही, तर विश्वास, समर्पण, एकमेकांप्रती असलेली निखळ आपुलकी आहे.

इ.स. तिसऱ्या शतकात संत व्हॅलेंटाईन यांनी प्रेमासाठी दिलेल्या बलिदानाच्या स्मरणार्थ १४ फेब्रुवारी हा दिवस जगभर Valentine’s Day म्हणून साजरा केला जातो.

या प्रेमदिनानिमित्त आपल्या आयुष्यातील खास व्यक्तींना सांगूया तुम्ही आहात म्हणून आयुष्य सुंदर आहे.

दरम्यान काही ठिकाणी संस्कृती जपण्याच्या भूमिकेतून साधेपणाने दिवस साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आले मात्र बहुतांश नागरिकांनी सकारात्मक वातावरणात आनंद साजरा केला.

व्हॅलेंटाईन डे हा केवळ प्रेमिकांसाठीच नसून पालक, मित्र, कुटुंबीय आणि समाजातील सर्व नात्यांमध्ये प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Back To Top