शेळवे ता.पंढरपुर येथे गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी संपन्न

शेळवे ता.पंढरपुर येथे गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशन तर्फे मोफत आरोग्य तपासणी संपन्न

शेळवे/संभाजी वाघुले /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथे श्री गायकवाड ज्ञानेश्वर फाऊंडेशन व ग्रामपंचायत शेळवे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर,चष्मे वाटप व औषध वाटप संपन्न झाले.

या शिबिराचे उद्घाटन सरपंच सुनीता अनिल गाजरे व उपसरपंच रामचंद्र दिगंबर गाजरे यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ.सुनील पवार ,न्यूरो फिजिशियन डॉ राहुल नागणे , ऑर्थोपेडिक सर्जन डॉ रोहित शिंदे, फिजिशियन डॉ प्रवीण बाबर,डेंटल सर्जन डॉ अभिलाष धायतडक, डॉ अमित भोसले, डॉ धीरज सुळे,डॉ स्वप्नील व्यवहारे,डॉ विवेकानंद घोडके, डॉ आदित्य पवार,डॉ परवीन शेख,डॉ शुभम गाजरे,डॉ विनय मुसळे, डॉ शेषराज बागल, डॉ आकाश काळे,डॉ आशिष लवटे,डॉ युवराज काळे, डॉ विकास कोळेकर,संतोष गाजरे,दशरथ पाटील,मा.उपसरपंच सोमनाथ पोरे,रमेश गाजरे,हनुमंत आसबे,किरण गाजरे,अनिल गाजरे,समाधान गाजरे, बाळासाहेब गाजरे, राहुल ताटे,नवनाथ आसबे,सुधाकर शिंदे, चैतन्य गाजरे,शशिकांत नागटिळक,अक्षय कांबळे,दीपक गायकवाड,बालाजी जाधव, दत्ता जगताप,अमर बाबर, विश्वनाथ कोळी, विकास गायकवाड,चिदानंद कोळी,रोहित भोसले यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

यावेळी मनोगत कृषी उत्पन्न बाजार समिती मा संचालक रमेश गाजरे व्यक्त केले. या शिबिराचा उद्देश व आरोग्य विषयी माहिती डॉ सुजित गायकवाड यांनी दिली.शिबिराचे प्रास्ताविक विश्वस्त संग्राम गायकवाड यांनी केले.आभार उपसरपंच रामचंद्र गाजरे यांनी मानले.सूत्रसंचालन अंकुश गाजरे यांनी केले.

Leave a Reply

Back To Top