अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदोत्सव उत्साहाने साजरा
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरचे अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यान मालेत तिसरे पुष्प गुंफण्यात आले.

या कार्यक्रमाचे तिसरे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक शिवाजीराव बागल सर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूरचे मानद सचिव सु.र. पटवर्धन सर उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात शारदा मातेच्या मूर्ती पूजनाने झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी नवरात्री उत्सवानिमित्त तयार केलेले भित्ती पत्रकाचे अनावरण करण्यात आले.

अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ एच आर वाघमारे सरांनी मनोगतामध्ये कॉलेजमधील शारदोत्सवाबद्दल माहिती दिली.
प्रमुख पाहुणे शिवाजीराव बागल सर यांनी बोलताना सांगितले की जगातील कोणतीही पदवी घेता येईल परंतु मातृत्वाची पदवी परमेश्वराने बहाल केल्याशिवाय मिळत नाही म्हणून संस्कृती जपली पाहिजे शिक्षकी पेशाबद्दल माहिती देताना सांगितले की ज्ञान व विज्ञानाची कास धरली पाहिजे .
सु.र.पटवर्धन सर यांनी श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी.श्रद्धा ही आपल्याला विचाराकडे नेते असे सांगितले.

प्रमुख पाहुण्यांची ओळख कु.स्नेहल राऊत यांनी करून दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.अर्पिता कोकाटे यांनी केले.विद्यार्थी मनोगत कु.घाडगे सानिका यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.कांबळे साक्षी व कु.बहिरवाडे मानसी यांनी केले.कु. रुपाली चौधरी व कुमारी केसकर यांनी रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमाचा समारोप श्रीपाद हरिहर यांनी केला.
या कार्यक्रमाला अध्यापक विद्यालयाचे सर्व छात्र अध्यापक, प्रा.गंगथडे सर,प्रा.हरिदास सर,प्रा.जाधव सर प्रा.शिखरे सर,प्रा.पाडवी सर आदींसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

