एकवीसाव्या शतकातील लोहपुरुष आणि संघटन महारथी — अमित शाह
सहकारातून समृद्धी – शाह यांच्या दूरदृष्टीचा नवा भारत
संघटनेचे शिल्पकार – अमित शाह : आधुनिक भारताचा लोहपुरुष
लेखक – सत्येंद्र कुमार जैन
पवित्र ग्रंथ श्रीमद् भागवद्गीतेत म्हटले आहे — यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते॥
अर्थात श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतात, सामान्य लोक तेच आचरण अनुसरतात. श्रेष्ठ व्यक्ती जे प्रमाण स्थापित करतात, जग त्याच प्रमाणावर चालते.
भारतातील सर्वाधिक काळ गृहमंत्री राहण्याचा मान पटकावणारे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे असेच एक श्रेष्ठ पुरुष आहेत. त्यांनी आपल्या तप, त्याग, कार्यनिष्ठा, संघटनकौशल्य आणि अखंड परिश्रमाने स्वतःला सिद्ध केले आहे.
२२ ऑक्टोबर १९६४ रोजी मुंबईत गुजराती कुटुंबात जन्मलेले अमित शाह यांचे बालपण गुजरातमधील मानसा येथे गेले. बालपणीच त्यांनी भारतीय शास्त्र, व्याकरण व महाकाव्यांचा अभ्यास केला. त्यांच्या विचारांत भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब दिसून येते. त्यांच्या आयुष्यात आई श्रीमती कुसुमबेन यांचा मोठा प्रभाव होता- स्वदेशी, खादी व भारतीय संस्कृतीप्रेमाची शिकवण त्यांनी आईकडून घेतली.
बालसंस्कारातून राष्ट्रभावनेचा अंकुर
१९७७ मध्ये आपत्कालानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये १३ वर्षीय अमित शाह मेहसाणा मतदारसंघात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कन्या मणीबेन पटेल यांच्या प्रचारासाठी गल्लीबोळात पोस्टर लावत फिरत होते. याच काळात त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी परिचय झाला आणि राष्ट्रसेवेचा संस्कार मनात रुजला.
१९८० मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत दाखल झाले आणि १९८२ मध्ये गुजरातचे संयुक्त सचिव बनले. पुढे त्यांनी भाजपच्या बूथ एजंटपासून प्रवास सुरू करून १९८९ मध्ये अहमदाबाद महानगर सचिव, १९९५ मध्ये गुजरात राज्य वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांनी तोट्यातील महामंडळ २१४ टक्के नफ्यात आणले – त्यांच्या आर्थिक दूरदृष्टीचे हे उदाहरण आहे.

संघटन कौशल्याची झेप आणि राजकीय यशाची परंपरा
१९९७ मध्ये ते भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष झाले. त्याच वर्षी सरखेज विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मिळाली आणि २५ हजार मतांनी विजय मिळवून ते प्रथमच विधायक झाले.
२००२ मध्ये ते अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आणि बँकेला घाट्यातून नफ्यात नेले. २००२ ते २०१० दरम्यान ते गुजरात सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्री राहिले. त्यांनी प्राथमिक शाळांमध्ये शतरंजाचा अभ्यासक्रम सुरू करून मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना दिली.
२०१३ मध्ये त्यांना भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि उत्तर प्रदेश प्रभारी बनवण्यात आले. त्यांच्या रणनीतीमुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात ७३ जागा जिंकल्या.
२०१४ मध्ये ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.त्यांच्या नेतृत्वात ११ कोटींहून अधिक सदस्य असलेली भाजप जगातील सर्वात मोठी राजकीय संघटना ठरली.देशभरात २००० पेक्षा अधिक कार्यालये उभारली गेली.
२०१९ मध्ये त्यांच्या अध्यक्षीय काळात भाजपने ३०३ जागा जिंकून ऐतिहासिक विजय नोंदवला.त्याच वर्षी ते केंद्रीय गृहमंत्री बनले.
धारा ३७० रद्द करून एक भारत श्रेष्ठ भारत साकार
५ ऑगस्ट २०१९ रोजी अमित शाह यांनी कलम ३७० आणि ३५(अ) रद्द करून जम्मू-काश्मीरचे भारताशी पूर्ण एकीकरण साध्य केले.त्यांनी उत्तरपूर्व भारतात ब्रू-रियांग समझोता, असम-मेघालय सीमावाद निराकरण, आणि बोडो करार घडवून शांततेचा मार्ग खुला केला.
त्यांच्या झिरो टॉलरन्स पॉलिसीमुळे नक्षलवाद १२६ जिल्ह्यांवरून फक्त ११ जिल्ह्यांपर्यंत मर्यादित झाला आहे. आज तो केवळ ३ जिल्ह्यांत शिल्लक आहे. त्यांनी २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णतः निर्मूलनाचे लक्ष्य ठेवले आहे.
२०२१ मध्ये ते भारताचे पहिले सहकार मंत्री झाले आणि सहकारातून समृद्धी या मंत्राने देशभर दोन लाखांहून अधिक सहकारी संस्था स्थापन केल्या.

अखंड पुरुषार्थी, संघटन महारथी – अमित शाह
अमित शाह हे भारतीय जनता पक्षाचे अद्वितीय संघटक, शिल्पकार आणि संघटन महारथी आहेत. त्यांनी एक भारत श्रेष्ठ भारताची संकल्पना साकार केली, धारा ३७० हटवली, नक्षलवाद नष्ट केला आणि सहकारातून नवा भारत घडवला.
ते खरेच सरदार वल्लभभाई पटेलांचे आधुनिक अनुयायी आहेत.म्हणूनच अमित शाह हे २१व्या शतकातील ‘भारताचे लोहपुरुष’,आयर्न मॅन आणि फौलादी व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहेत.
“धारा ३७० ते नक्षलवाद निर्मूलन – अमित शाह यांचे राष्ट्रकर्म”