तळोदाची टीम ठरली आदर्श- ग्राहक पंचायत महाराष्ट्र अभ्यासवर्गात शिस्त, एकता आणि ज्ञानाचा संगम-डॉ. विजय लाड
ज्ञान,शिस्त आणि प्रेरणेचा सोहळा- तळोदाच्या अभ्यासवर्गाने घातला उत्कृष्टतेचा नवा मापदंड
नाशिक /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/११/२०२५ – नाशिक विभागस्तरीय ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा अभ्यासवर्ग तळोदा येथे अतिशय यशस्वीपणे पार पडला.130 पेक्षा अधिक साधकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात तळोदा टीमने उत्कृष्ट नियोजन,आदर्श आयोजन आणि शिस्तबद्धता दाखवत प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.उद्घाटनापासून समारोपा पर्यंतची सर्व सत्रे ज्ञानवर्धक ठरली.

राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड आणि अरुण वाघमारे यांनी तब्बल 15 तासांचा प्रवास करून मार्गदर्शन केले. तसेच पत्रकार श्री.डागा यांच्या राज्य टीममधील समावेशाची घोषणा हा कार्यक्रमातील विशेष क्षण ठरला. आमदार राजेश पाडवी, प्रशासकीय अधिकारी,दाते,व्याख्याते आणि सर्व साधकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अविस्मरणीय झाला.

नाशिक विभागातील ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा कालचा अभ्यासवर्ग तळोदा येथे ज्ञान, शिस्त आणि प्रेरणेचा संगम ठरला.या अभ्यासवर्गात पंचप्राण, ज्येष्ठ साधकांचा जीवनगौरव आणि उत्कृष्ट साधक सन्मान सोहळा सर्वांच्या मनात कायमचा घर करून गेला.

तळोदा टीमच्या एकजुटीने आणि परिपूर्ण नियोजनामुळे अभ्यासवर्गाला वेगळीच उंची मिळाली. 130 हून अधिक साधकांची उपस्थिती आणि अतिथींच्या मनापासूनच्या सहभागामुळे संपूर्ण विभागासाठी हा कार्यक्रम आदर्श ठरला.

