पारदर्शक काच ठेवा..पोलीसांना सहकार्य करा आणि सुरक्षिततेचा आदर्श ठेवा


वाहनांवर काळी काच लावणे म्हणजे वाहतूक नियमांचा भंग — रायगड पोलिसांचा नागरिकांना इशारा

रायगड / ज्ञानप्रवाह न्यूज –रायगड जिल्हा पोलीस वाहतूक शाखेने नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या वाहनांवर काळी काच (ब्लॅक फिल्म black film) लावू नये.ही कृती वाहतूक नियमांचा भंग असून, अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


पोलीसांनी सांगितले की वाहनांची काच पारदर्शक ठेवणे हे स्वतःची आणि इतरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अत्यावश्यक आहे.अपघात आणि गुन्हे रोखण्यासाठी ही काळजी महत्त्वाची ठरते.
नियम पाळा,अपघात टाळा या संदेशासह रायगड पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
जबाबदार नागरिक बना – वाहतूक नियम पाळा.आपली सेवा,आपली सुरक्षा.

