तुकाराम महाराज बीज उत्सव पंढरपुरात भक्तिभावात साजरा; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हरिनामाचा गजर

तुकाराम महाराज बीज उत्सव पंढरपुरात भक्तिभावात साजरा; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हरिनामाचा गजर

तुकाराम महाराज बीज उत्सव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथे उत्साहात साजरा

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज: संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या बीज दिना निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर येथे भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी पहाटेपासूनच मंदिर परिसरात हरिनामाचा गजर, अभंग गीते व भजन-कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस दर्शन घेतले तसेच संत तुकाराम महाराजांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन केले.

मंदिरात विशेष पूजा व आरती करण्यात आली. संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या हरिनामाच्या संदेशाचे स्मरण करून भाविकांनी गाथा, अभंग व हरिनाम संकीर्तनाद्वारे भक्तिभाव व्यक्त केला.

या उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने सर्व व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली होती.

Leave a Reply

Back To Top