दिल्ली हिंसाचार : सीसीटीव्ही फोडणं हादेखील कटाचा भाग, हायकोर्टाची टिप्पणी


हायलाइट्स:

  • दिल्ली उच्च न्यायालयासमोर आरोपीची जामीन याचिका
  • न्यायालयानं आरोपीची जामीन याचिका फेटाळली
  • विरोध प्रदर्शनाच्या वेळी आरोपीच्या हातात तलवारही दिसून आली होती

नवी दिल्ली : फेब्रुवारी २०२० मध्ये राजधानी दिल्लीत घडवून आणलेल्या दिल्ली दंगल प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहेत. या दरम्यान उच्च न्यायालयानं एक महत्त्वाची टिप्पणी केलीय. दिल्लीत उसळलेला हिंसाचार हा अचानक उद्भवलेली परिस्थिती नव्हती तर एका सुनियोजित पद्धतीनं हा हिंसाचार घडवून आणला गेल्याचं न्यायालयानं स्पष्टपणे नमूद केलंय. यादरम्यान हिंसाचाराच्या काही व्हिडिओंचाही उल्लेख न्यायालयानं केलाय.

सोमवारी दिल्ली हिंसाचार प्रकरणातील आरोपीची जामीन याचिका फेटाळताना उच्च न्यायालयानं ही टिप्पणी केली. कायदे-व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी अत्यंत सुनियोजित पद्धतीनं हा हिंसाचार घडवून आणण्यात आला, असं न्यायालयानं म्हटलंय.

हिंसाचाराचे समोर आलेल्या व्हिडिओंतून आंदोलकांचं वर्तन स्पष्टपणे दिसत आहे. प्रशासनाचं कामकाजावर प्रभाव पाडण्यासाठी आणि शहरातील सामान्य जनजीवन विस्कळीत करण्याच्या हेतूनं या हिंसाचाराचं प्लानिंग अगोदरच करण्यात आलं होतं, असंही न्यायालयानं सुनावणी दरम्यान म्हटलं.

शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्थितरित्या तोडफोड शहरातील कायदे-व्यवस्था बिघडवण्यासाठी कट रचल्याचं स्पष्टपणे दर्शवते, असं न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी म्हटलंय.

Kahnmigar Glacier: ‘लाहौल-स्पीती’नजिक खंमीगर ग्लेशिअरमध्ये १४ ट्रेकर्स अडकले; थंडीनं दोघांचा मृत्यू
Sharmistha Mukherjee: माजी राष्ट्रपती कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांचा राजकारणाला राम-राम!

काठ्या, बॅट आणि तलवारीचा वापर

शेकडो दंगेखोरांनी पोलिसांच्या एका दलावर काठ्या, दंडुके, हॉकी स्टिक आणि बॅटनं हल्ला घडवून आणला होता, असंही न्यायालयानं यावेळी नमूद केलं.

दरम्यान विरोध प्रदर्शनाच्या वेळी आरोपीच्या हातात तलवारही दिसून आली होती. आरोपीच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, रतन लाल यांचा मृत्यू तलवारीच्या वारामुळे झालेला नाही. आरोपीनं केवळ स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी तलवार हातात घेतली होती.

राजधानी दिल्लीच्या उत्तर – पूर्व भागात २३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंसाचार घडवून आणण्यात आला होता. जवळपास सलग तीन दिवस हा हिंसाचार सुरू होता. या दरम्यान ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर शेकडो जण गंभीर जखमी झाले होते.

asaduddin owaisi : ‘हैदराबादमधील चारमीनार आमच्या अब्बाची इमारत, या अब्बासमोर’
akash prime : आकाक्ष प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, शत्रूचे हल्ले हवेतच नष्ट करणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: