मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई 12 जण ताब्यात,लाखोंचा मुद्देमाल जप्त

मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई 12 जण ताब्यात,लाखोंचा मुद्देमाल जप्त

तळसंगी येथे मन्ना जुगार खेळताना रंगेहात पकडले; 4.72 लाखांचा ऐवज जप्त

मंगळवेढा|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19 एप्रिल 2026 – मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तळसंगी गावात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत 12 जणांना रंगेहात पकडले. ही कारवाई दि.19 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 4.05 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गावातील मराठी शाळेजवळील मोकळ्या जागेत आरोपी गोलाकार बसून 52 पत्यांच्या साहाय्याने पैशांची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळत होते. याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले.या कारवाईत पोलिसांनी 2,100 रुपयांची रोख रक्कम, जुगार साहित्य (पत्ते) तसेच विविध कंपन्यांच्या मोटारसायकली असा एकूण 4,72,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी शरद कदम यांनी फिर्याद दिली असून आरोपीं विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिकारी श्री.बनकर, खंडागळे, बाबर, कदम, राऊत यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पो.हे.कॉ. खंडागळे करत आहेत.पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Back To Top