अक्षयतृतीया उत्साहात साजरी; श्री रूक्मिणी मातेस आकर्षक अलंकार परिधान,आमरस परंपरेला सुरुवात

अक्षय तृतीया Akshaya Tritiya निमित्त पंढरपुरात रुक्मिणी Rukmini मातेस सुवर्ण अलंकार; महानैवेद्यात आमरसाचा समावेश

अक्षयतृतीया उत्साहात साजरी; श्री रूक्मिणी मातेस आकर्षक अलंकार परिधान,आमरस परंपरेला सुरुवात

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०४/ २०२६: हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीया Akshaya Tritiya निमित्त पंढरपूर येथील रुक्मिणी Rukmini मातेस आकर्षक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले. या विशेष सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

मंदिर व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड,तोडे, तानवड, चिंचपेटी,जव मणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार,मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ,हायकोळ,सरी,कंबरपट्टा आदी अलंकारांनी सजविण्यात आले.

तसेच पारंपरिक पद्धतीनुसार अक्षय तृतीयेपासून वटपोर्णिमेपर्यंत श्रींच्या महानैवेद्यामध्ये बदल करण्यात येतो. याअंतर्गत नेहमीच्या शेवयाच्या खिरीऐवजी आता आमरसाचा समावेश करण्यात आला आहे.या धार्मिक परंपरेमुळे भक्तांमध्ये विशेष उत्साह असून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे.

Leave a Reply

Back To Top