पंढरपूर तालुक्यातील कासेगावमध्ये बसवेश्वर जयंती निमित्त सामाजिक एकतेचा संदेश

कासेगावमध्ये महात्मा बसवेश्वर Mahatma Basaveshwar जयंती उत्साहात साजरी; लिंगायत समाजाचा मोठा सहभाग

पंढरपूर तालुक्यातील कासेगावमध्ये बसवेश्वर जयंती निमित्त सामाजिक एकतेचा संदेश

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन,आरती आणि प्रसाद वाटपासह समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग.

कासेगाव ता.पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज, दि.19 एप्रिल : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे Mahatma Basaveshwar महात्मा बसवेश्वर महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या निमित्ताने सामाजिक एकता आणि परिवर्तनाचा संदेश देण्यात आला.

महात्मा बसवेश्वर महाराज हे 12 व्या शतकातील महान समाजसुधारक होते. त्यांनी अंधश्रद्धा,जातीयता,अनिष्ट प्रथा आणि कर्मकांड यांचा विरोध करून समतावादी समाजव्यवस्था उभी करण्याचे कार्य केले.अनुभव मंटप च्या माध्यमातून लोकशाही मूल्यांचा पाया त्यांनी घातला, त्यामुळेच त्यांना लोकशाहीचे जनक मानले जाते.

या कार्यक्रमात बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर लिंगायत समाजबांधवांच्यावतीने प्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी महालिंग लिगाडे,मोहन खताडे, सिद्धेश्वर लिगाडे,रेवणसिद्ध साखरे, नानासो साखरे,रामलिंग लिगाडे साठे, सागर लिगाडे, समाधान साखरे, विशाल कुंभार, उमेश गोटे, लखन दहिहांडे, वीरेंद्र शेंडे,मंगेश कुंभार,नागनाथ नष्टे,नागराज लिगाडे आदी समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top