कासेगावमध्ये वीर शिवा काशीद जयंती उत्साहात साजरी;प्रदीप कदम यांचे प्रेरणादायी व्याख्यान

कासेगावमध्ये वीर शिवा काशीद जयंती उत्साहात साजरी; प्रदीप कदम यांचे प्रेरणादायी व्याख्यान

निष्ठावंत मावळा वीर शिवा काशीद यांना अभिवादन; कासेगावात महाप्रसाद व व्याख्यानाचा कार्यक्रम

कासेगाव | शुभम लिगाडे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.५ मे २०२६ – पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे वीर शिवा काशीद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जयंतीनिमित्त प्रसिद्ध व्याख्याते प्रदीप कदम पुणे यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.आपल्या भाषणातून त्यांनी वीर शिवा काशीद यांच्या शौर्य, निष्ठा आणि बलिदानाची माहिती देत उपस्थितांना इतिहासाची प्रेरणा दिली.

कार्यक्रमाची सुरुवात वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यानंतर नाभिक समाज बांधवांच्यावतीने उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,ग्रामस्थ तसेच सकल नाभिक समाजाचे बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे परिसरात देशभक्तीचे आणि इतिहासप्रेमाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Back To Top