योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहते – तहसीलदार सचिन लंगुटे

पंढरपूरमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा; योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहते – तहसीलदार सचिन लंगुटे

आरती मंडपात सामूहिक योगाभ्यास; विविध योग संस्थांच्या सहभागाने जागतिक योग दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Pandhapur news : पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१ : जागतिक योग दिनानिमित्त पंढरपूर शहरातील विविध योग संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आरती मंडप प्रांगण येथे उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तालुका प्रशासन, पांडुरंग परिवार, पतंजली योग संस्था, श्री विठ्ठल रुक्मिणी योग प्राणायाम संस्था आणि निसर्ग उपचार केंद्र यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार सचिन लंगुटे, युवक नेते ॲड.प्रणव परिचारक, पी.एस.आय. गोसावी, पंढरपूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन रा.पा.कटेकर,पतंजली संस्थेचे सुरेंद्र पिसे,ॲड.सुनिल वाळूजकर, ज्योती शेटे,अमृता परिचारक, वृक्षप्रेमी ग्रुपचे सोमनाथ होरणे तसेच भाजप शहराध्यक्ष रोहित पानकर यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना तहसीलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले की,२१ जून हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत हा प्रस्ताव मांडला होता. त्यास १७७ देशांचा पाठिंबा मिळाल्यानंतर २१ जून २०१५ रोजी पहिला जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारे शास्त्र आहे.नियमित योगासने, प्राणायाम आणि ध्यान यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतात, मन एकाग्र होते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दररोज योगाचा सराव करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले. स्वागत सुरेंद्र पिसे यांनी केले. प्रास्ताविक ॲड. सुनिल वाळूजकर यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती शेटे यांनी केले. उमा महाविद्यालयाचे प्राचार्य बाड सर यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संजय देशपांडे, मधुकर सुतार, प्रशांत आगावणे, रवींद्र कोडग, त्रिभुवन तारे, निसारभाई शेख, चंदुलाल सुपेकर, आप्पासाहेब मुचलंबे, ॲड. रामलिंग कोष्टी, कांतीलाल सुपेकर आणि गजेंद्र माने यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शहरातील विविध योग संस्थांचे पदाधिकारी, योग साधक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top