आ.समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश; म्हैसाळ योजनेत पाणी सोडल्याने मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाला मोठा दिलासा

आ.समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश; म्हैसाळ योजनेत पाणी सोडल्याने मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाला मोठा दिलासा

कृष्णा-पंचगंगा पुराचे अतिरिक्त पाणी म्हैसाळ कालव्यात,पंढरपूर- मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज : कृष्णा आणि पंचगंगा नदीतील पावसामुळे वाढलेले अतिरिक्त पुराचे पाणी म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यात सोडण्याची आ. समाधान आवताडे यांनी केलेली मागणी शासनाने मान्य केली असून, त्यानुसार म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे.या निर्णयाने मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार असून शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आ.समाधान आवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे ही मागणी केली होती.पत्रात त्यांनी नमूद केले होते की, कृष्णा व पंचगंगा नदी खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असून अतिरिक्त पाणी विनाकारण वाहून जात आहे.दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी पेरणी आणि पाण्याच्या दुहेरी संकटाला सामोरे जात आहेत.

त्यामुळे कृष्णा व पंचगंगा नदीतील अतिरिक्त पुराचे पाणी म्हैसाळ योजनेच्या वितरिका क्रमांक १, २ तसेच उमदी वितरिकेत सोडल्यास पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांसाठीही मोठा फायदा होईल,असे त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

कार्यकारी अभियंता मासाळ यांनी सांगितले की, आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीची दखल घेत म्हैसाळ योजनेच्या कालव्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचा मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाला लाभ होणार आहे.

पंढरपूर तालुक्यालाही दिलासा

वीर धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निरा-भाटघर NRBC प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे निरा नदीत ६,००० क्यूसेक पाणी सोडण्यात आले असून ते भीमा नदीमार्गे पुढे प्रवाहित होत आहे.

या पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेतीपंपा साठी केवळ दोन तास मिळणारा वीजपुरवठा अपुरा असल्याने तो आठ तास करण्याची मागणीही आ. समाधान आवताडे यांनी केली होती. ही मागणीही शासनाने मान्य केल्याने पुढील दोन दिवसांत आठ तास वीजपुरवठा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय वीर धरणातील पाणीसाठा वाढल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील कॅनॉलच्या लाभक्षेत्रातील गावांसाठीही कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले असून पावसाअभावी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Back To Top